प्रेग्नेंसीबाबतच्या उलट-सुलट चर्चांमुळे आलिया भट्टचा संताप; मी एक स्त्री, पार्सल नाही

प्रेग्नेंसीबाबतच्या उलट-सुलट चर्चांमुळे आलिया भट्टचा संताप; मी एक स्त्री, पार्सल नाही

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या चित्रपट, फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. यात आलिया 14 एप्रिल रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली. यानंतर दोन महिन्यातच तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आलिया लवकरचं आई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता तिच्या प्रेग्नेंसी आणि करिअरबाबत चर्चा सुरु आहेत. एका न्यूज पोर्टलने एका दावा केला होता की, आलियाचं शूटिंग संपल्यावर रणबीर तिला न्यायला जाणार आहे. तसेच आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची योजना अशाप्रकारे केली आहे ज्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्टवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र प्रेग्नेंसीबाबतच्या सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे आलिया भट्टने संताप व्यक्त केला आहे, तसेच तिच्या प्रेग्नेंसीबाबत वेगवेगळे दावे करणाऱ्या एका न्यूज पोर्टल आलिया भट्टने सडेतोड उत्तर दिले आहे.

आलियाने नुकताच एका वृत्त वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा स्क्रीन शॉर्ट शेअर करत आलियाने लिहिले की, अजूनही काही लोकांना वाटतेय की आपण पुरुषप्रधान जगात राहतो, कोणत्याच गोष्टीला उशीर करण्यात आलेला नाही! कोणालाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, मी एक स्त्री आहेस पार्सल नाही! मला अजिबात आराम करण्याची गरज नाही, पण तुमच्या सगळ्यांकडे डॉक्टर असल्याचे प्रमाणपत्र असल्याचे जाणून चांगलं वाटलं. आपण आता 2022 मध्ये आहोत, कृपया या जुनाट विचारसरणीतून बाहेर पडू शकतो का? माफ करा मला जावं लागेल कारण शॉट रेडी आहे. या पोस्टमधून आलियाने प्रेग्नेंसीवरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना चांगलेच फटकारले आहे, आलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान आलिया शूटिंगमुळे लंडनमध्ये व्यस्त असून ती लवकरचं मुंबईत येणार असल्याच्या चर्चा होत्या. अशात आलियाने आई होणार असल्याची गोड बातमी दिल्याने सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यात जुलैअखेर पर्यंत ‘आलिया रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार असल्याची चर्चा आहे.


आलिया लग्नाआधीच होती गरोदर? बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी सुद्धा लग्नाआधी दिली होती गूड न्यूज

First Published on: June 28, 2022 10:00 PM
Exit mobile version