देसी गर्ल Priyanka Chopraने सांगितले मंगळसूत्र घालण्याचे महत्त्व, म्हणाली…

देसी गर्ल Priyanka Chopraने सांगितले मंगळसूत्र घालण्याचे महत्त्व, म्हणाली…

देसी गर्ल Priyanka Chopraने सांगितले मंगळसूत्र घालण्याचे महत्त्व, म्हणाली...

देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली असली तरी भारतीय संस्कृती तिने सोडलेली नाही. ती नेहमीच भारतीय सण उत्सव विदेशात राहून साजरे करताना दिसते. तसेच ती आपले संस्कारही विसरलेली नाही. प्रियंका अनेकदा मंगळसूत्र घालून समोर आली आहे. प्रियंकाने नुकताच मंगळसूत्राचे महत्त्व पटवून दिले आहे. (Priyanka Chopra jonas said the importance of wearing Mangalsutra)  अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत लग्न केल्यानंतर पहिल्यांदा मंगळसूत्र घालल्यानंतर प्रियंकाला काय वाटले हेही तिने सांगितले. प्रियंकाने एक ज्वेलरी ब्रँडला प्रोमोट करताना सोशल मीडियावर एक छान पोस्ट केली आहे.

प्रियंका आणि नीक जोनस यांनी डिसेंबर 2018मध्ये लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये त्यांनी ग्रँड वेडिंग आयोजित केली होती. प्रियंका म्हणाली ‘मला आठवतय की मी पहिल्यांदा मंगळसूत्र घातले होते तेव्हा माझ्या मनात काय भावना आल्या होत्या. कारण आपण त्या गोष्टीचा अर्थ समजून मोठे झालो आहोत’. प्रियंकाने पुढे म्हटलेय, ‘मी पहिल्यांदा मंगळसूत्र गळ्यात घातले तो क्षण माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण होता. तेव्हा मी त्याकडे एक आधुनिक मॉर्डन जगातील स्त्री म्हणून त्याकडे पाहत होती. मला मंगळसूत्र घालायला आवडते. ही देखील पितृसत्ताक गोष्ट आहे? पण मी अशी पिढी आहे जी या सगळ्याच्या मधली कुठे तरी आहे. कोणाला परंपरा जपायला आवडतात पण त्यांना आपण कोण आहोत हेही माहिती आहे का?’

प्रियंका म्हणाली, आपल्याला माहिती आहे की आपण कुठे उभे आहोत. इथून पुढच्या पिढीतील मुली काहीतरी वेगळे करताना दिसणार आहेत. त्या काहीही करुन आपली मागची पंरपरा पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंपरा सांभाळणे म्हणजे संभाषण पुढे नेण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणाचे, कशाचे प्रतिनिधित्व करता हे जर समजून घ्यायचे असेल तर तुमची परंपरा पुढे सुरू ठेवा.

प्रियंकाने सांगितलं मंगळसूत्राचं महत्त्व

प्रियंकाने यावेळी मंगळसूत्र घालण्याचे महत्त्व समजावून सांगितले ती म्हणली, मी लग्न झाल्यापासून दररोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि पुढे जात आहे. मंगळसूत्र तयार करण्यासाठी काळ्या मण्यांचा वापर केला जातो. कारण काळ्या रंगामुळे आपले वाईट नजरांपासून संरक्षण होते.


हेही वाचा – Priyanka Chopra बनणार आई! Nick Jonas सोबत करतेय फॅमिली प्लॅनिंग

First Published on: January 18, 2022 2:24 PM
Exit mobile version