83 Trailer Review: क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयाची कहाणी सांगणारा सिनेमा

Wait is over! कारण ८३ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. १९८३ मधल्या देशाच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप विजयाची कहाणी सांगणारा हा सिनेमा म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते आणि फायनली सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अभिनेता रणवीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे तर अभिनेत्री दीपिका पादुकोन या सिनेमाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.  दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.

प्रत्येक भारतीयाची क्रिकेट ही एक कमजोरी आहे आणि १९८३मध्ये क्रिकेटने भारताला नवी ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली. ३ मिनिटे ४९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांचा वर्ल्ड कप जिंकण्याची संपूर्ण  प्रवास त्यांची जिद्द आणि मेहनत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  सिनेमाच्या ट्रेलर रियल आणि इमोशनल आहे.

ऐवरी अतरंगी कपड्यात फिरणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह या सिनेमात मात्र एका वेगळ्यात अंदाजात दिसतोय. ट्रेलरमध्ये कपिल देव यांच्या मुलाखतीचा एक सीन दाखवण्यात आलाय तो सीन पाहताना खरंच कपिल देव बोलत आहेत का असा भास होतो. रणवीर सिंह नाही तर खरंच कपिल देव समोर बोलत असल्याचे वाटत आहे.

ट्रेलर म्हटलं फक्त हिरोवर फोकस केला जातो मात्र ८३च्या ट्रेलरमध्ये केवळ रणवीर नाही तर सिनेमातील इतर पात्रांवर देखील फोकस करण्यात आलाय.  ट्रेलरवरुन  एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे ती म्हणजे क्रिकेटच्या संपूर्ण टिममधला प्रत्येक चेहरा फार विचार करुन फिट करण्यात आला आहे. प्रत्येकाच उत्तम लुक तयार करुन प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. केवळ ट्रेलरच नाही तर आतापर्यंत सिनेमाचे जितकेही पोस्टर्स  आलेत त्यातही टीममधील प्रत्येक खेळाडूंचे फोटो दाखवण्यात आले आहेत.

ट्रेलरमध्ये पुढे एंट्री होते ती म्हणजे अभिनेत्री दीपीका पादुकोन हीची. सिनेमात कपिल देव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील फोकस करण्यात आला आहे. कपिल देव यांची पत्नी रोमीच्या व्यक्तिरेखा दीपीका साकारणार आहे. सिनेमात दीपीकाचाही एक आगळा वेगळा लुक समोर आला आहे. सिनेमातील दिपीकाचा रोल तसा छोटा आहे पण महत्त्वाचा आहे.

२४ डिसेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो. हिंदी, तमिळ,तेलुगू,कन्नड आणि मल्याळम भाषेत सिनेमा पाहता येणार आहे. भारताच्या १९८३ च्या प्रतिष्ठीत क्रिकेट मॅचचा पुन्हा एकदा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा नक्की पहायला हवा.


हेही वाचा – 83 Movie : रणवीर सिंह ‘कपिल देव’ यांच्या भूमिकेत दिसतोय हुबेहुब ; पाहा फोटो

First Published on: November 30, 2021 4:52 PM
Exit mobile version