83 Movie : रणवीर सिंह ‘कपिल देव’ यांच्या भूमिकेत दिसतोय हुबेहुब ; पाहा फोटो

Bollywood actor Ranveer Singh looks like ditto Kapil Dev in '83' movie
83 Movie : रणवीर सिंह 'कपिल देव' यांच्या भूमिकेत दिसतोय हुबेहुब ; पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा बहुप्रतिक्षित ‘८३’ या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या शानदार टीझरने पुन्हा एकदा ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा ‘८३’ हा चित्रपट यावर्षी २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेल्या भूमिकेत हुबेहुब ‘कपिल देव’ यांच्यासारखेच दिसत आहे.

 

 


हे ही वाचा – अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात भोपाळमध्ये जामीनपात्र वॉरंट जारी