शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…

शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…

लगिरं झालं जी(lagir zala ji) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर(shivani bavkar) नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. शिवानीने साकारलेलया शीतल या भूमिकेमुळे तीने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लागिरं झालं जी या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतलं असला तरीही शीतल ची क्रेझ काही कमी झाली नाही. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत असलेली शिवानी सोशल मीडियावर सुद्धा कायमच सक्रिय असते. नुकताच शिवानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिवनीने ही पोस्ट आषाढी एकादशीचे(ashadhi ekdashi ) औचित्य साधून केली होती. पण ही पोस्ट शिवनीसाठी खूपच खास आहे.

हे ही वाचा – देवदासला २० वर्षे पूर्ण! चित्रपटाचं बजेट ५० कोटीपर्यंत गेल्याने निर्मात्याला झाली होती…

अभिनेत्री शिवानी बावकर ही इंस्टाग्रामवर नेहमी ऍक्टिव्ह असते. नुकताच शिवसनिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar), राजेश टोपे(rajesh tope) आणि रावसाहेब दानवे ही राजकीय वर्तुळातील दिग्गज मंडळी दिसत आहेत. या फोटोला शिवनीने हटके कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यात शिवानी बावकर म्हणते,

हे ही वाचा – तब्बल तीन महिन्यांनी हर्ष-भारतीने शेअर केला बाळाचा फोटो

”जय जय राम कृष्ण हरी
जय जय हरी विठ्ठल

राजेश सरकटे निर्मित ‘गजर पंढरीचा’ रौप्य महोत्सवी भक्तीमय कार्यक्रमाचा आषाढी एकादशी निमित्त आस्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झाले. आषाढी एकादशीचा तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील याची खात्री आहे. माननीय श्री शरद पवार साहेब, माननीय श्री रावसाहेब दानवे साहेब आणि माननीय श्री राजेश टोपे साहेब अश्या सुश्रुत व्यक्तींची भेट होणे व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणे हा माझ्यासाठी अतिव आनंदाचा अनुभव.” असे कॅप्शन शिवनीने पोस्टला दिले आहे.

हे ही वाचा –  sharad pawar 1993 bomblast : मुंबईत १२ व्या बॉम्बस्फोटाच्या घटनेवर खुद्द शरद…

शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाल्याचा आनंद शिवनीच्या(shivani bavkar) पोस्ट मधून सुद्धा दिसत होता. दरम्यान, लागिरं झालं जी या मालिकेत शिवनीने साकारलेली शीतल ही व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही मालिका आणि मालिकेतील शिवनीची व्यक्तीरेखा अल्पावधीतच प्रेकक्षक पसंतीस उतरली होती.

हे ही वाचा – Sharad Pawar-Narendra Modi : शरद पवारांनी संजय राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला

 

 

First Published on: July 13, 2022 11:25 AM
Exit mobile version