सुबोध भावेला झाली त्याच्या जुन्या मालिकांची आठवण; सुबोधची पोस्ट चर्चेत

सुबोध भावेला झाली त्याच्या जुन्या मालिकांची आठवण; सुबोधची पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपट सृष्टीमधील अष्टपैलू आणि आघाडीचा कलाकार म्हणून अभिनेता सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोधने अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. सुबोध भावे सूत्रसंचालक म्हणून लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट सुद्धा शेअर करत असतो. नुकतच सुबोधबे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे त्याचीच चर्चा सध्या होत आहे.

हे ही वाचा – लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

अभिनेता सुबोध भावेने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या निमित्ताने सुबोधने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या आगामी कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर त्या पोस्ट मध्ये सुबोध भावेने त्याच्या जुन्या मालिकांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

हे ही वाचा –  अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

सुबोध भावे त्याच्या पोस्ट मध्ये म्हणतोय,

”हे झी मराठी वाले मला वेगवेगळ्या वाहनातून लई फिरवतात राव “कुलवधू” ला घोड्यावरून एन्ट्री,”तुला पाहते रे” ला विमानआणि आता”बस बाई बस ” च्या वेळेस प्रत्यक्ष बस आणि या प्रवासात मी एकटा नाही तर सोबतीला सर्वसामान्य गृहिणीच प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील ५ महिला आणि जिच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत ती एक सेलिब्रिटी महिला.आता बोला…..आज मुंबईत प्रत्यक्ष बस मध्ये या कार्यक्रमा संदर्भात पत्रकार मित्र – मैत्रिणींशी गप्पा झाल्या. थोडक्यात काय तर २९ जुलै पासून तुमचं मनोरंजन करायला आम्ही सगळे येतोय. २९ जुलै पासून दर शुक्र आणि शनि रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर.”

नाटक, चित्रपट, मालिका या तिनही क्षेत्रात कमी करत सुबोध भावेने स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनतर ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून सुबोध भावे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने महिलांसाठी विशेष आहे.

हे ही वाचा –  अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर भरणारा भारतीय कलाकार; आयकर विभागाकडून सन्मान

First Published on: July 26, 2022 1:35 PM
Exit mobile version