घरमनोरंजनअक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर भरणारा भारतीय कलाकार; आयकर विभागाकडून सन्मान

अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर भरणारा भारतीय कलाकार; आयकर विभागाकडून सन्मान

Subscribe

अभिनेता अक्षय कुमार हा कर भारण्यातही आघाडीवर आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक करदाता ठरला आहे. यासाठी आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान सुद्धा करण्यात आला.

बॉलिवूड मधील खिलाडी कुमार अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar0 हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखला जातो. अक्षय कुमारचा चाहता वर्ग सुद्धा मोठा. अभिनय असो, डान्स असो किंवा फिटनेस असो अक्षय नेहमीच अव्वल असतो. त्याच प्रमाणे अभिनेता अक्षय कुमार हा कर भारण्यातही आघाडीवर आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक करदाता ठरला आहे. यासाठी आयकर(income tax) विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान सुद्धा करण्यात आला.

हे ही वाचा – Akshay Kumar ले घेतलं मुंबईत आलिशान घर, किंमत ऐकून उडेल तुमची झोप

- Advertisement -

अभिनेता अक्षय कुमारचे दरवर्षी ४ ते ५ सिनेमे प्रदर्शित होतात. बॉलिवूड मधील हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता कर भारण्यातही अग्रेसर ठरला आहे. एका रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar) सलग पाच वर्षे सर्वाधिक करदाता हा किताब पटकावत आहे. आणि म्हणूनच आयकर विभागाने अक्षय कुमारला सन्मानपत्र देऊन त्याचा गौरव केला आहे. अक्षय कुमार सध्या यूकेमध्ये त्याच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. आयकर विभागाकडून देण्यात आलेले सन्मानपत्र अक्षयच्या टीमने त्याच्या वतीने स्वीकारला. या सन्मान पत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – रणबीरची जादू ओसरली, प्रमोशन आणि खर्च मोठ्या प्रमाणावर; ‘शमशेरा’ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद

सध्याच्या घडीला सर्वाधिक सिनेमे करणारा अभिनेता म्हणून असंखय कुमारकडे पाहिले जाते. त्याच सोबत अक्षय कुमार चित्रपटांसोबतच जाहिरातींमधूनही झळकत आहे. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर सुद्धा झळकणार आहे.

हे ही वाचा – 21 वर्षांपूर्वी Akshay Kumar आणि Twinkle khanna यांच्या लग्नासाठी डिंपल कपाडियाने ठेवली…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -