Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousShardiya Navratri 2023 : 'हे' आहेत नवरात्रीचे 9 रंग; वाचा रंगांचे महत्व

Shardiya Navratri 2023 : ‘हे’ आहेत नवरात्रीचे 9 रंग; वाचा रंगांचे महत्व

Subscribe

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

- Advertisement -

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रि 2023 कब है? जानें तिथि, समय, पूजन विधि और महत्व | Chaitra Navratri 2023 know date time shubh muhurat puja vidhi and its significance | TV9 Bharatvarsh

नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग परिधान करण्याची पद्धत आहे. मात्र खरंतर ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक वारांचे रंग निश्चित केले आहेत. प्रत्येक वाराच्या ग्रहानुसार तो रंग परिधान केला जातो. परंतु रोजच्या आयुष्यात वारानुसार रंग परिधान करणं प्रत्येक व्यक्तिला जमत नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये वेगवेगळे रंगांचे कपडे परिधान केले जातात. शिवाय या रंगांमुळे प्रत्येकामध्ये उत्साह संचारतो.

- Advertisement -

नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा केली जाते सोबतच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे देखील परिधान केले जातात. असं म्हणतात की, नवरात्रीतले 9 दिवस त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

2023 चे नवरात्री रंग

Navratri 2021: 7 अक्टूबर से शुरू होगी नवरात्रि, जानें कलश स्थापना का शुभ मुहूर्त और विधि - shardiya navratri 2021 date kalash sthapana shubh muhurat vidhi samagri tlifd - AajTak

 

पहिला दिवस- नारंगी

हा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. या रंगाला हिंदू धर्मात विशेष महत्व प्राप्त आहे.

दुसरा दिवस- पांढरा

पांढरा रंग सात्वीकता आणि शांततेचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने मन प्रसन्न राहते.

तिसरा दिवस- लाल

लाल रंग शक्ती आणि उर्जेचे प्रतीक आहे. हा रंग देवीला खूप प्रिय आहे. या रंगाच्या वापराने मनात उत्साह संचारतो.

चौथा दिवस- निळा

निळा रंग आत्मविश्वास,साहस आणि शांतीचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने आत्मविश्वास वाढतो.

पाचवा दिवस- पिवळा

पिवळा रंग आनंद आणि चैतन्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच धार्मिक कार्यात या रंगाचा अधिक वापर केला जातो.

सहावा दिवस- हिरवा

हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग देखील देवीला खूप आवडतो. या रंगाच्या वापराने सौभाग्यवृद्धी होते.

सातवा दिवस- राखाडी

हा रंग संयम, विकास, पवित्रतेचा प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने व्यक्तीमध्ये संयम निर्माण होतो.

आठवा दिवस-जांभळा

हा रंग महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. या रंगाच्या वापराने व्यक्तीमध्ये महत्वकांक्षा निर्माण होते.

नववा दिवस- मोरपिसी

हा रंग स्थिर बुद्धी, नाविण्यतेचे प्रतीक आहे. हा रंग अत्यंत शुभ मानला जातो.


हेही वाचा :

Shardiya Navratri 2023 : कधी आहे घटस्थापना? जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

- Advertisment -

Manini