उपवासात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाचे पॅटिस कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 4 उकडलेले बटाटे
- पाव किलो पनीर
- आल्याची पेस्ट
- 3-4 हिरव्या मिरच्या
- लिंबाचा रस
- मीठ
- बदाम
- मनुका
- शेंगदाण्याचा कुट
- तेल
- राजगिऱ्याचं पीठ
कृती :
- सर्पप्रथम चार उकडलेल्या बटाट्यांचे मध्यम काप करायचे. त्यामध्ये पाव किलो पनीर घालून ते व्यवस्थित बारीक मिक्स करून घ्या.
- त्यानंतर या मिश्रणात आल्याची पेस्ट घाला आणि मग त्यामध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
- मग त्यात एक चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, भिजवून बारीक काप केलेले बदाम, मनुका आणि थोडेसे शेंगदाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थितीत मळून घ्या. त्यानंतर पॅटिस करायला घ्या.
- चपातीसाठी तयार करत असलेल्या गोळ्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा घ्या.
- मग सर्व पॅटिस राजगिऱ्याच्या पिठात व्यवस्थित कोट करून तळून घ्या.
- अशा प्रकारे तुम्ही उपवासासाठी खास फराळी पॅटीस करू शकता.