Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousआज अधिक महिन्यातील पहिला सोमवार 'या' राशींवर असणार महादेवाचा आशीर्वाद

आज अधिक महिन्यातील पहिला सोमवार ‘या’ राशींवर असणार महादेवाचा आशीर्वाद

Subscribe

आज श्रावण अधिक महिन्यातील पहिला सोमवार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. ज्योतिष शास्त्रानुसार आज रवियोग, शिवयोग हे शुभ योग तयार झाले असून या दिवशी काही राशींच्या व्यक्तींना महादेवांचा आशीर्वाद होतो.

या राशींना प्राप्त होणार महादेवाचा आशीर्वाद

- Advertisement -
  • मेष

12 राशीतील पहिल्या स्थानावर असलेल्या मेष राशींच्या व्यक्तींवर महादेवांची विशेष कृपा असते. महादेवांना ही रास अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आजही महादेवांचा आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींवर असणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहिल.

  • वृषभ

आज वृषभ राशीच्या व्यक्तींवर देखील महादेवाची विशेष कृपा असणार आहे. आज नोकरी-व्यवसायात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल.

- Advertisement -
  • कर्क

आज कर्क राशीच्या व्यक्तींवर महादेवांचा आशीर्वाद असले. करिअरमध्ये यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

  • मकर

महादेवांना मकर रास देखील अत्यंत प्रिय आहे. महादेवांच्या कृपेने यांना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होईल. या व्यक्तींनी आज महादेवांची पूजा-आराधना करावी. शिवलिंगावर जल अर्पण करावे.

  • कुंभ

कुंभ रास देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या राशीच्या व्यक्तींनी आयुष्यातील संकटं दूर करण्यासाठी दररोज एक माळ ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा.


हेही वाचा :

23 जुलैपासून ‘या’ 4 राशींची होणार चांदी

- Advertisment -

Manini