घरAssembly Session Liveराज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, विरोधकांची विधानसभेत मागणी

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, विरोधकांची विधानसभेत मागणी

Subscribe

आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी आता पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Session 2023 : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे अनेक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी आता शेतात शिरले आहे. आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी आता पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून करण्यात आली आहे. विधानसभेत आजचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेच विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Help the damaged farmers of the state immediately, the opposition demands in the assembly)

हेही वाचा – निधी देताना कुणावरही अन्याय झालेला नाही, पण… भरतशेठ गोगावलेंचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

आजच्या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार संजय कुटे यांनी यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावासामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती सभागृहात दिली. या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला असून सभागृहाने या घटनेची दखल घ्यावी, असे आमदार संजय कुटे यांच्याकडून शासनाला सांगण्यात आले. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी 10 हजार रुपये मदत करून यावर कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल, याचा शासनाकडून विचार केला गेला पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आमदार कुटे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांबाबतचे सविस्तर निवेदन आज सभागृहाचे कामकाज संपण्याआधी देण्यात येईल, तसेच नुकसान झालेल्या भागांसाठी निधीची कोणतीही कमतरता येणार नाही, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, या सरकारवर विश्वास कसा करायचा? अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. अवकाळी पावसाचा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. सरकारची परिस्थिती फार वाईट आहे. अजित पवार हे विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सरसकट मदतीची मागणी केली होती. पण आज परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना तुटपूंजी रक्कम न देता, शेतकऱ्यांसाठी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत नाना पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच, शेतकऱ्यांना फक्त आश्वासन न देता त्यांना भरीव मदत देण्यात यावी, असे पटोले यांच्याकडून मागणी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -