जुही दोन राज्यांचे दर्शन घडवणार

जुही दोन राज्यांचे दर्शन घडवणार

Juhi Chawla

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कामगारांनासुद्धा मानाचे स्थान दिले जाते. हा दिवस कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. निवडणुका नसत्या तर जिकडेतिकडे 1 मे ची तयारी दिसायला लागली असती. जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत सण-उत्सव-दिवस साजरे केले जातीलच याची खात्री देता येत नाही. मग संघटना, संस्था आपल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करताना दिसणार आहेत. एपिक वाहिनीने महाराष्ट्र दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन दोन राज्यांना नजरेसमोर ठेवून विशेष कार्यक्रमाची निर्मिती केलेले आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरात या राज्याचीही महती यानिमित्ताने अधोरेखित केली जाणार आहे. प्रत्येक राज्याचे खास असे वैशिष्ठ्य राहिलेले आहे. ते कार्यक्रमात आले तर प्रेक्षक अशा कार्यक्रमांची दखल घेतात. त्यातून अशा कार्यक्रमांमध्ये एखाद सेलिब्रेटी निवेदक, सूत्रसंचालक म्हणून आला तर तेही प्रेक्षकांना हवेच असते.

अभिनेत्री, निर्माती म्हणून जुही चावला तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, पण ती उत्तम सूत्रसंचलनही करते हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. एपिक वाहिनीवर दोन राज्यांची वैशिष्ठ्ये दाखवणारा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी जुहीवर सोपवलेली आहे. गड, किल्ले, प्रेक्षणीय स्थळ याचे अप्रूप पर्यटकांमध्ये प्रचंड आहे. त्याचबरोबर राज्य एक असले तरी प्रत्येक जिल्ह्यातील खाद्यपदार्थ खवय्यांसाठी नेहमीच चवदार राहिलेले आहेत. त्याही गोष्टी या कार्यक्रमामध्ये दाखवल्या जाणार आहेत. वैज्ञानिकदृष्ठ्या प्रत्येक राज्याची प्रगती दिसली तरी या दोन्ही राज्यातील रहिवासी श्रद्धेपासून काही अलिप्त राहिलेले नाहीत. चंपानेर, दौलताबाद, मुरूड या ऐतिहासिक वास्तूंचा मागोवा घेताना गणपतीपुळे, शिर्डी, कोल्हापूर इथल्या प्रसिद्ध देवस्थानांचा लौकीक या कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे.

First Published on: May 1, 2019 4:00 AM
Exit mobile version