16 डिग्री वर AC म्हणजे चेहऱ्यवर wrinkles आणि बीपीचा त्रास

उन्हाळ्याच्या दिवसात एसीचा वापर फार वाढला जातो. सतत होणाऱ्या उष्णतेमुळे शरिराला थंडावा मिळावा म्हणून एसी सतत चालू ठेवतो. तसेच त्याचे कुलिंगचे तापमान ही फार कमी ठेवतो. खरंतर असे करणे चुकीचे असून याचा परिणाम तुमच्या हेल्थवर होऊ शकतो. प्रत्येकवेळी एसीत राहणे आणि त्यानंतर उन्हात येणे यामुळे ही तुम्ही आजारी पडू शकता.

तज्ञ असे सांगतात की, जेवढा वेळ तुम्ही एसीत बसाल तेवढाच परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. खरंतर एसीमुळे शरिरात एक ओलावा निर्माण होते. त्यामुळे विविध आजार वाढण्याची शक्यता वाढते. तसेच संपूर्ण दिवस एसी सुरु ठेवण्यासाठी तुम्ही खिडक्या, दरवाजे बंद करतात त्यामुळे वेंटिलेशन योग्य प्रमाणात होत नाही. अशातच दुषित हवेत आपण श्वास घेतो. एसी खोलीतील हवा रिसाइल करते. फ्रेश हवेत ऑक्सिजन व्यतिरिक्त काही कंपनोटंस असतात जे न मिळाल्यास गुदमरल्यासारखे वाटत राहते. याला सिक बिल्डिंग सिड्रोम होण्यामागील ही एक कारण आहे.

एसी आणि चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांचा काय संबंध?
थंड आणि कोरड्या हवेत राहिल्याने घाम कमी येतो. तसेच तेल खुप निघते यामुळे पिंपल्स, वेळेआधीच सुरकुत्या आणि स्किन जळजळ करते. ऐवढेच नव्हे तर एसीचे तापमान खुप असेल तर स्किनवरील पोर्स ही बंद होतात. त्यामुळे स्किन इंन्फ्केक्शन ही होते. यामुळेच आपण प्रत्येकवेळी एसीत राहिलो तर वयाआधीच म्हातारे दिसू लागतो.

या व्यतिरिक्त तास न् तास एसीत बसल्याने शरिराचे तापमान खाली जाते. म्हणजेच कमी होते. यामुळे शरिरातील कोशिका हे आकंचुन पावण्यास सुरुवात होते. रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. याच कारणास्तव ब्लड प्रेशर वर-खाली होण्याचे कारण ठरु शकते. तसेच ज्यांना अर्थराइटिसची समस्या आहे त्यांना एसीत खुप वेळ बसल्यानंतर समस्या होऊ शकते. त्यांचे स्नायू दुखू शकतात किंवा सूज वाढू शकते.


हेही वाचा- दैनंदिन सवयीत ‘हे’ बदल केल्यास रुमेटाइड अर्थराइट्सपासून रहाल दूर

First Published on: May 25, 2023 2:03 PM
Exit mobile version