Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthदैनंदिन सवयीत 'हे' बदल केल्यास रुमेटाइड अर्थराइट्सपासून रहाल दूर

दैनंदिन सवयीत ‘हे’ बदल केल्यास रुमेटाइड अर्थराइट्सपासून रहाल दूर

Subscribe

रुमेटाइड अर्थराइट हा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये तुमचे सांधे दुखणे, सुज येणे आणि स्नानूत गोळा येण्याचे कारण ठरु शकते. हे एक प्रकारचे ऑटोइम्यून आजार आहे. ज्यामध्ये शरिरातील इम्युनिटी शरिरातील हेल्दी कोशिकांना नुकसान पोहचू शकते. अशातच याचा परिणाम स्नायूंवर होतो आणि ते कमजोर होतात. जेनेटिक्स, हार्मोनल आणि नैसर्गिक फॅक्टर्सच्या कारणास्तव ही समस्या उद्भवते. यासाठी अयोग्य लाइफस्टाइल जबाबदार आहे.

संक्रमण, धुम्रपान शारिरीक आणि भावनात्मक तणावाची लक्षण ट्रिगर करु शकतात. असे नव्हे की, या समस्येवर उपचार करता येत नाही. पण काही गोष्टी लक्षात घेता तुम्ही रुमेटाइड अर्थराइट्स होण्यापासून तुम्ही दूर राहू शकता. तसे कसे करावे याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

-डाएटकडे लक्ष द्या


नेहमीच प्रोटीन आणि हेल्दी फॅट युक्त ताज्या पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. लक्षात ठेवा की, तुम्ही पोषक तत्व ही योग्य प्रमाणात घ्यावेत जे तुमच्या शरिरासाठी अनिवार्य आहे.या व्यतिरिक्त अँन्टी इन्फ्लेमेटरी फूड्सचे सेवन जसे की, हेल्दी अँन्टीऑक्सिडेंट्सने समृद्ध असलेले पदार्थ.

- Advertisement -

-नियमित व्यायम करा


शरिरीक स्थितरा काही आजारांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे केवळ तुमची हाडंच नव्हे तर स्नायू सुद्दा दुखतात. शरिराची हालचाल न झाल्यास लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, मधुमेह अशा काही आजारांची समस्या वाढू लागते. यामुळे तुमच्या आवडीच्या शारिरीक हालचालींमध्ये सहभागी व्हा. प्रत्येक वेळी जिममध्ये जाऊन 2 तास व्यायाम करणे गरजेचे नाही.

-धुम्रपान करण्यापासून दूर रहा


तुम्हाला माहितीच आहे की, धुम्रपान करणे आरोग्यासाठी किती घातक असते. धुम्रपान केल्याने तुमचे स्नायू आणि हाडं कमजोर होतात. जर तुम्ही अर्थराइट्सच्या समस्येचा सामना करत असाल तर तुमचे स्नायू यावेळी खुप दुखतील. त्यामुळे तज्ञ नेहमीच धुम्रपान करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

-दारुचे सेवन


जर तुम्ही दारुचे सेवन करत असाल तर आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याची मर्यादा पाळली पाहिजे. एका ठराविक मर्यादेत दारु न प्यायल्यास डिहाइड्रेशन होऊ शकते. यामुळे स्नायूंच्या लुब्रिकेशनवर परिणाम होतो आणि सांधे दुखतात. त्याचजसोबत दारु ही तुमच्या इम्युनिटीला प्रभावित करते.

-बॉडी मास इंडेक्सकडे लक्ष द्या


आजकाल लाइफस्टाइलमध्ये एक हेल्दी वजन मेंटेन करणे अत्यंत मुश्लिक आहे. परंतु बॉडी मास इंडेक्स अर्थराइटिसला प्रोत्साहन देतो. त्याचसोबत याच्या लक्षणांना सुद्धा ट्रिगर करु शकते. त्यामुळे वजन नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटकडे जरुर लक्ष द्या.


हेही वाचा- महिलांनो ‘या’ हार्मोन्समुळे तुम्ही आहात फिट

- Advertisment -

Manini