Acidity होऊ नये यासाठी खा ‘ही’ फळं

Acidity होऊ नये यासाठी खा ‘ही’ फळं

पोटात गॅस होणे किंवा अॅसिडिटी होणे ही एक सामान्य समस्या आहे. अॅसिडिटी अशीवेळी होते जेव्हा शरीरात अॅसिड तयार होऊ लागते. याच कारणास्तव छाती आणि पोटात दुखणे सुरु होते. त्यामुळे या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे याच बद्दल आपण अधिक जााणून घेऊयात.

केळं


केळ्यात अॅसिडिटीच्या समस्येवर फायदेशीर ठरते. पोटातील अॅसिडसाठी केळ सुरक्षित मानले जाते. कारण यामध्ये Alkaline गुण असतात. या व्यतिरिक्त हे पोटातील अॅसिड संतुलित करण्यास मदत करते. जेणेकरुन अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडीची लक्षणे कमी केली जाऊ शकतील.

सफरचंद


पोटातील अॅसिडिटीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सफरचंद उत्तम मानले जाते. कारण यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम सारखे अल्केलाइन खनिज असतात. ते पोटात अॅसिड रिफ्लक्सची लक्षणे दूर करण्यास मदत करतात. त्याचसोबत ब्लोटिंग आणि पोटासंबंधित काही समस्या ही दूर करण्यास मदत करते.

पेर


पेर हे एक सिट्रस फळ आहे. मात्र पोटासाठी फायदेशीर मानले जाते. पेर खाल्ल्याने शरिरातील अॅसिड रिफ्लक्स कमी होऊ शकते. त्याचसोबत ब्लोटिंगची समस्या दूर होण्यास ही यामुळे मदत होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरचे सेवन करावे.

नारळ


नारळ अॅसिडिटीच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत करेल. कारण यामध्ये कमी अॅसिडिक गुण असतात. नारळाचे पाणी प्यायल्याने बॉवेल मुवमेंट आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते.


हेही वाचा- केस गळती थांबविण्यासाठी तसेच सुंदर त्वचेसाठी आहारात करा ‘या’ बियांचे सेवन

First Published on: September 5, 2023 11:39 AM
Exit mobile version