Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthकेस गळती थांबविण्यासाठी तसेच सुंदर त्वचेसाठी आहारात करा 'या' बियांचे सेवन

केस गळती थांबविण्यासाठी तसेच सुंदर त्वचेसाठी आहारात करा ‘या’ बियांचे सेवन

Subscribe

सुदृढ राहण्यासाठी विविध पोषक पदार्थांचे सेवन आपण करतो. फळं, भाज्या, अंडी, मासे, ड्राय फ्रुट्स यांच्यासोबतच विविध बियांचे सेवन देखील उत्तम मानले जाते. नकळतपणे आपण अनेकदा त्या बियांचे आहारातून सेवन करतो. ज्यांचा आपल्या आरोग्याला उत्तम असा फायदा होतो. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या बिया आहेत त्यांचा आरोग्यावर कसा आणि काय फायदा होतो.

आहारात करा ‘या’ बियांचे सेवन

  • भोपळ्याच्या बिया

Pumpkin seeds: Benefits, nutrition, uses

- Advertisement -

भोपळ्याच्या बिया बऱ्याचदा सुकत घालून अनेक घरांमध्ये खाल्ल्या जातात. बंगाल आणि बिहारमध्ये या राईच्या तेलात तळून त्याचे सेवन केले जाते. याचा फायदा हृदय, नसा आणि हाडांसाठी होतो.

  • तीळ

Sesame Seeds (Safed Til) (Organic) - ThukralFoods

- Advertisement -

नैराश्य, ताणतणाव वाढणाऱ्या हार्मोन्सना कमी करण्यात तीळ उपयुक्त ठरतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या स्निग्धतेचा पुरवठा करणारे हेच तीळ शरीरास घातक असणारे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही त्यांची मदत होते.

  • टरबूज बिया

Muskmelon seeds online | Kharbuje ke beej | Goingnuts

टरबूजाच्या बियांमध्ये अनेक गुणधर्म असतात ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, मॅग्नेशियम हे पोषक घटक आढळतात. ही पोषक तत्वांमुळे शरीरातील समस्या दूर होतात.

  • सब्जा

Sabja Seeds- An Ideal Supplement for Weight Loss 🌱👍 – Purayati

 

ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असल्यामुळे सब्जाचे सेवन केले जाते. सब्जामुळे रक्तातील साखरेचे असंतुलित प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच जर शरीरात साखरेचे प्रमाण अधिक असल्यास ते कमी करण्यातही सब्जा उपयोगाचा ठरतो. त्यासोबतच सब्जा हा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केले जाते. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी देखील सब्जाचा वापर केला जातो.

  • अळशीच्या बिया

Alsi Seed, Pack Size: 10 To 100kg

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तसेच कर्करोगाचा धोकाही या बियांच्या सेवनाने कमी होतो.

  • सूर्यफुलाच्या बिया

Sunflower seeds will surely make your health shine – Nourish You

सूर्यफुलाच्या बियांमध्ये ओमेगा 6 चे प्रमाण आढळून येते. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही त्यांची मदत होते.


हेही वाचा :

आठवड्यातून एकदा तरी खा कारले; आहेत जबरदस्त फायदे

- Advertisment -

Manini