उपवासात होऊ शकतो अ‍ॅसिडिटी, अशक्तपणाचा त्रास; अशा प्रकारे घ्या काळजी

उपवासात होऊ शकतो अ‍ॅसिडिटी, अशक्तपणाचा त्रास; अशा प्रकारे घ्या काळजी

सध्या सगळीकडे चैत्र नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. नवरात्रीच्या काळात अनेकजण 9 दिवसांचा उपवास करतात. उपवासामुळे शरीर आणि मनाला अनेक फायदे होतात. उपवासात केवळ फलाहाराचे सेवन केले जाते. मात्र, कधी कधी अनेकांना उपवासामुळे अशक्तपणा येतो. त्यामुळे उपवासात नेहमी योग्य पदार्थांचे सेवन करावे.

उपवासात आहाराची घ्या काळजी

उपवासाच्या काळात उपाशी पोटी संत्री, द्राक्षे, लिंबूचे सेवन केल्याने अॅसिडिटी होऊ शकते. या फळांऐवजी तुम्ही केळी, सफरचंद, टरबूजाचे सेवन करु शकता.

उपवासाच्या काळात हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही उपवास करता त्यावेळी थंड पाण्याऐवजी गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करा. या काळात थोडं-थोडं पाणी प्या. एकदम जास्त पाण्याचे सेवन करु नका.

उपवासाच्या काळात अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यात तुम्ही राजगिरा, साबुदाणा, वरई, मखाणाचे सेवन करु शकता.

उपवासाच्या काळात दूध, नारळ पाणी, ताक, लस्सी, फळांच्या रसाचे सेवन करा.

 


हेही वाचा :

चैत्र नवरात्रीच्या उपवासांमध्ये ट्राय करा साबुदाण्याचे अप्पे

First Published on: March 23, 2023 5:02 PM
Exit mobile version