आवळा करतो उच्च रक्तदाबावर नियंत्रण

आवळा करतो उच्च रक्तदाबावर नियंत्रण

आवळा

हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना रक्तदाबाचा त्रास असतो. काहींना उच्च रक्तदाब तर काहींना रक्तदाब कमी होण्याचा त्रास असतो. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने देखील तुम्ही यावर नियंत्रण ठेवू शकता.

*आवळ्यामध्ये जीवनसत्व ‘क’चे प्रमाण सर्वाधिक असते. याचा फायदा रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास होतो.

*जीवनसत्व ‘क’ हे अँटिऑक्सिडंटस असल्याने आरोग्य सुधारण्यात मोठी मदत करतो.

*तसेच रक्तपेशींचे कार्यही सुरळीत राहण्यास याचा फायदा होतो.

*आवळ्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहते.

*आवळ्याचा रस प्यायल्याने रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो. तसेच हार्ट अ‍ॅटॅकचा धोकाही कमी होतो.

*यासाठी चमचाभर आवळ्याच्या रसात मध मिसळून पिणे फायदेशीर असते.

*आवळ्यासोबत बीपी कंट्रोलसाठी केशरचाही फायदा होतो.

First Published on: December 28, 2018 4:25 AM
Exit mobile version