रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसंबंधित या गोष्टी टाळा

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसंबंधित या गोष्टी टाळा

आरोग्यासोबतच स्किन हेल्दी ठेवणं अत्यंत देखील अत्यंत गरजेचं आहे. अनेकजण स्किनची व्यवस्थित काळजी घेण्यास कंटाळा करतात ज्यामुळे कलांतराने अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्यांमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, फाइन लाइन्स येणे. आपल्यापैकी काहीजण स्किनची केअर करतात. पण रात्री झोपण्यापूर्वी देखील त्वचेशी काळजी घ्यायला हवी. ज्याकडे आपले दुर्लक्ष होते.

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची घ्या काळजी

काही महिला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढण्यास विसरतात. जे तुमच्या स्किनसाठी अतिशय नुकसानदायक असते. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर प्रत्येकवेळी आपल्या चेहऱ्यावरील मेकअप काढणे गरजेचे आहे.

अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला तेल लावतात. पण यामुळे त्वचा तेलकट होते. तेलाच्या जागी तुम्ही मॉइश्चराइजरचा वापर करु शकता. रात्री झोपण्यापूर्वी स्किनची अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे नाइट स्किन रुटीनमध्ये हेल्दी ऑप्शनची निवड करा.

काही महिला केवळ रात्रीच मॉइश्चराइजर लावतात. पण असे करणे टाळावे. कारण रात्री जर मॉइश्चराइजर लावले असेल तर सकाळी सुद्धा ते लावणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या स्किनला पुरेशा प्रमाणात पोषण मिळते.


हेही वाचा :

उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी

First Published on: April 10, 2024 3:26 PM
Exit mobile version