Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBeautyउन्हाळ्यात त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी

Subscribe

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. नेहमीच्या तुलनेने यंदा उष्णता अधिक असून या तीव्र उष्णतेपासून त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानाने तुमच्या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

कडक उन्हामुळे त्वचा तेलकट होते ज्यामुळे त्वचेवर मुरुम येतात. उन्हाच्या किरणांमुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि पिगमेंटेशन समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात आर्द्रतेची पातळी देखील आपल्या केसांचे नुकसान करू शकते, ज्यामुळे केसांमध्ये गुंता आणि कोरडेपणा येतो. घाम आणि उष्णतेमुळे टाळूची जळजळ आणि कोंडा होऊ शकतो, ज्यामुळे उन्हाळ्यात टाळूच्या समस्यांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

- Advertisement -

त्वचा आणि केसांसाठी आवश्यक टिप्स

Woman at beach Stock Photos, Royalty Free Woman at beach Images | Depositphotos

  • सनस्क्रीन लावून सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करा. या किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे सनबर्न होऊ शकते, जे त्वचेमध्ये खोलवर पोहोचू शकते आणि पेशींना हानी पोहोचवू शकते. रासबेरी सारख्या घटकांचा समावेश असलेल्या सनस्क्रीनचा वापर केल्याने अतिनील किरणांपासून बचाव होऊ शकतो आणि त्वचेची जळजळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका कमी करता येतो.
  • उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरल्याने तुमच्या त्वचेला संरक्षण मिळते. खराब झालेल्या त्वचेचे पोषण आणि त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, योग्य मॉइश्चरायझरची निवड करा. हा घटक केवळ त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेलाचे उत्पादन देखील नियंत्रित करतो, ज्यामुळे उन्हाळ्यात हवामानाच्या बदलांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • तुमच्या रोजच्या जेवणात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करून उन्हाळ्यात तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. हा चौरस आहार कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. आहारातील व्हिटॅमिन, आणि अँटिऑक्सिडंट्सच्या मुबलक प्रमाणामुळे आपल्या त्वचेचे सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करता येते.
  • उन्हाळ्यात, उष्णता आणि आर्द्रतेमुळे तुमची त्वचा तेलकट होऊ शकते, विशेषत: घामामुळे त्वचेचे नुकसान होते. या तेलकटपणामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि ब्रेकआउट्सची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचा स्वच्छ राखण्यासाठी क्लिन्झरचा वापरणे गरजेचे आहे.
  • उन्हाळ्यात, कमीतकमी मेकअप करणे आणि डोळ्यांचा मेकअप टाळणे योग्य राहिल.
  • उन्हाळ्याच्या दिवसात शरीर पुरेसे हायड्रेड राहिल याकडे लक्ष द्या. शरीर हायड्रेट्ड राखण्यासाठी रोजच्या दिनचर्येत ग्रीन टी, आइस्ड टी, नारळाचे पाणी आणि काकडीचा रस यांसारखी थंड पेयांचा समावेश करा, भरपुर पाणी प्या. यामुळे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत होते आणि त्वचा ताजीतवानी वाटू शकते.
  • तुमच्या केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी हीट स्टाइलिंग उत्पादनांचा वापर टाळा.
  • उन्हाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमितपणे ट्रिम करा.

हेही वाचा :

चमकदार त्वचेसाठी जायफळ फेसपॅकचा करा वापर

- Advertisment -

Manini