बाजरीची सकस खिचडी

बाजरीची सकस खिचडी

bajrichi khichadi

रोज रोज बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर बाजरीची खिचडी नक्की ट्राय करता येईल. बाजरी खूप उष्ण असते. सर्व धान्यांत बाजरी तुलनेने खूप हलकी, रूक्ष आहे. त्यामुळे कफविकार, सर्दी, खोकला, दमाग्रस्त रुग्णांनी व स्थूल व्यक्ती यांनी आहारात बाजरीचा समावेश करावा.

साहित्य
बाजरी ४० ग्रॅम, मुगाची डाळ २५ ग्रॅम, गाजर २० ग्रॅम, तेल ८ ग्रॅम. (गाजराऐवजी रताळे सुद्धा वापरू शकता.)

कृती
सर्वप्रथम गाजर किसून घ्या. त्यानंतर मुगाची डाळ अर्धी शिजवून घ्या. आता शिजलेल्या मुगाच्या डाळीत किसलेले गाजर व मीठ टाकून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिर्‍याची फोडणी करावी. आता गरम गरम शिजलेल्या डाळ, बाजरीच्या मिश्रणाला जिर्‍याची फोडणी द्यावी. बाजरीच्या खिचडीत गाजराऐवजी रताळे सुद्धा वापरू शकता.

First Published on: February 8, 2019 5:31 AM
Exit mobile version