दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत यामुळे आजच्या काळात पती पत्नी अशा दोघांना नोकरी करणे गरजेचे झाले आहे. यामुळे गेल्या काही वर्षात वर्कींग वुमनची संख्याही वाढली आहे. पण यात प्रामुख्याने सर्वाधिक तारेवरची कसरत करावी लागते ती महिलांना. कारण सगळचं काम बेस्ट करण्याच्या नादात महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. यामुळे थकवा, अशक्तपणाबरोबरच मानसिक ताण तणावाचा सामना महिलांना घराबरोबरच कामाच्या ठिकाणीही करावा लागतो. अशावेळी महिलांनी घर आणि ऑफिस यांच्यात ताळमेळ कसा साधावा याबद्दल समजून घ्यायला हवं. त्यामुळे घर आणि ऑफिस यांच्यात बॅलन्स राखणे सहज शक्य होऊ शकते. शिवाय महिलांना स्वत:साठीही वेळ मिळू शकतो.
- प्रायोरिटीज ठरवा
जर तुम्ही वर्कींग वुमन असाल तर सगळ्यात आधी तुमचे प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. यात जर तुम्हांला ताळमेळ साधायचा असेल तर त्यासाठी तुमचे प्राधान्य म्हणजेच प्रायोरिटीज ठरवा. ज्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तेव्हा तुमचे लक्ष पूर्णत कामात असणे गरजेचे आहे. कारण कंपनीने त्यांचे काम करण्यासाठी तुम्हांला नोकरी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हांला पगार दिला जातो. त्यामुळे कंपनीने तुमच्याकडून उत्तम कामाची अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ऑफिसच्या कामावेळी घरचे काम करत बसू नका.
- जबाबदाऱ्या वाटून दया
तुम्ही वर्किंग वुमन आहात सुपरवुमन नाहीत हे आधी समजून घ्या. घरापासून ऑफिसपर्यंत सगळंच काम एकट्याने करत बसू नका. घरातील कामाची विभागणी करा. घरातील प्रत्येकाला काम वाटून द्या. त्यामुळे प्रत्येकाला कामाचे महत्व समजते. ऑफिसमध्येही हाच पॅटर्न राबवा. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कामाची विभागणी करा. त्यानुसार तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांना कामाच्या जबाबदाऱ्या वाटून द्या. जेणेकरून तुम्हाला कामाचा ताण येणार नाही.
- एका वेळी एकच काम
निवांत आयुष्य जगण्यासाठी स्वत:ला वेळ द्यावा लागतो. त्यासाठी कामाचे तास आणि स्वता:साठी वेळ याचे टाईमटेबल तयार करा. त्यावेळेत मनाला आनंद देणारी कामे करा. त्यामुळे तुम्हांला कधीच मानसिक ताण येणार नाही. सगळीच काम एकाचवेळी करण्याचा अट्टाहास करू नका. त्यामुळे तुमचीच धावपळ होईल. जर ऑफिसमध्ये असाल तर त्याच कामाचा विचार करा. जर घरी असाल तर घरच्या कामाचा विचार करा.
- मदत मागण्यास संकोचू नका
बऱ्याचवेळा सगळंच करण्याचा अट्टाहास अंगाशी येतो. अशावेळी एकही काम धड होत नाही. अशा प्रसंगी मित्रांची सहकाऱ्यांची मदत घ्या.
हेही वाचा :