Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthशुगर क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी करा बालासन

शुगर क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी करा बालासन

Subscribe

गरजेपेक्षा अधिक खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हार्मोन असंतुलन सारख्या समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला सतत गोड खाण्याची सवय असेल आणि ही सवय कंट्रोल करायची असेल तर तुम्ही बालासन या योगासनाची मदत घेऊ शकता. बालासनाला चाइल्ड पोज असे ही म्हटले जाते. बालासन केल्याने शुगर फ्री क्रेविंगला कमी करण्यासह स्ट्रेस, चिंता सारखी समस्या ही दूर राहण्यास मदत होते. अशातच बालासन करण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

बालासन करण्याची योग्य पद्धत

- Advertisement -

Yoga: How To Do Balasana or Child's Pose And Why - Tata 1mg Capsules
बालासन करण्यासाठी सर्वात प्रथम योगा मॅट घेऊन त्यावर वज्रासन मुद्रेत बसा. त्यानंतर श्वास घेत तुम्ही तुमचे दोन्ही हात वरती घेऊन जात श्वास सोडत पुढच्या बाजूला झुका. असे तो पर्यंत करा जो पर्यंत तुमच्या हाताचे तळवे मॅटवर टेकत नाही. ही मुद्रा केल्यानंतर थोडावेळ त्याच पोजमध्ये रहा. हे आसन दररोज कमीत पाच वेळा करा.

बालासन करण्याचे फायदे
-बालासन केल्याने शुगर क्रेविंग नियंत्रणात राहण्यास मदत होते
-संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार सुरळीत होतो
-स्नायूसह पाठ दुखीची समस्या कमी होतो
-तुमचे शरीर लवचिक होते
-बालासन केल्याने तणावापासून तुम्ही दूर राहता

- Advertisement -

हेही वाचा- एकाग्रतेसाठी करा ‘ही’ योगासने

- Advertisment -

Manini