तापात अंघोळ करावी की नाही?

तापात अंघोळ करावी की नाही?

व्हायरल फिवरची प्रकरणे अधिक वाढतायत. डेंग्यू आणि मलेरिया प्रमाणे काही प्रकारचे आजार सुद्धा होण्याची भीती असते. अशातच बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, ताप आल्यानंतर अंघोळ करावी की नाही. यावर विविध मतं व्यक्त केली जातात. काही लोक अंघोळ तर दूर पाण्याच्या संपर्कात सुद्धा येत नाहीत. मात्र काहीजण तापात अंघोळ करतात. अशातच एक्सपर्ट्स याबद्दल काय म्हणतात हे पाहूयात.

एक्सपर्ट्सच्या मते, तुम्ही नक्की कोणत्या प्रकारच्या पाण्याने शॉवर घेता हे फार महत्त्वाचे असते. जर तुम्हाला व्हायरल फिवर असेल तर अंघोळ करण्यास समस्या नाही. खरंतर जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्ही शरीराचे तापमान वाढले जाते. शरीर दुखते आणि याच कारणास्तव तुम्ही उदास राहता. अशातच तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला बरे वाटू शकते. शरीराचे तापमान कमी होते. मसल्स ही रिलॅक्स होतात. अंघोळ करायची असेल तर कोमट पाण्याने करू शकता. थंड पाण्याने अंघोळ करू नये.

काही लोक ताप आल्यानंतर सतत झोपून राहतात. अशातच अंग अधिक तापले जाते. अशा स्थितीत तुम्ही अंघोळ केली तर आराम मिळेल. एक्सपर्ट्स असे सुद्धा म्हणतात की, डोक्यावरुन तापात अंघोळ करू नये. यामुळे तुम्हाला अधिक बरे वाटू लागणार नाही. अंघोळ करणे शक्य नसेल तर स्पंजचा वापर करू शकता. अथवा ओलसर कापडाने अंग पुसू शकता.


हेही वाचा- सातत्याने झोप कमी होणे ठरू शकते धोकादायक

First Published on: September 15, 2023 12:39 PM
Exit mobile version