Wednesday, May 8, 2024
घरमानिनीHealthसातत्याने झोप कमी होणे ठरू शकते धोकादायक

सातत्याने झोप कमी होणे ठरू शकते धोकादायक

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी जेवढे खाण्याची-पिण्याची आवश्यकता असते तेवढीच गरज झोपेची सुद्धा असते. जेव्हा तुम्ही उत्तम आणि पुरेशी झोप घेताल तेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स राहतो. तसेच तुम्हाला फ्रेश ही वाटते. पुरेशी झोप झाल्यास तुमचा मेंदू व्यवस्थितीत काम करू शकतो. या उलट जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुमच्या मेंदूच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो.एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूला नुकसान पोहचू शकते आणि तुम्ही काही आजाराचे शिकार होऊ शकता.

रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी केलायं असा दावा
भले तुम्ही या गोष्टीवरून चिंता करत नसाल की, झोप पूर्ण झाली नाही तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. मात्र याचा हळूहळू दीर्घकालीन याचा परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

उंदरांच्या मेंदूवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार असे सांगण्यात आले की, झोपेच्या कमतरतेमुळे कॉग्नेटिव्ह डिसफंक्शन म्हणजेच विचार करणे, घेण्याची क्षमता प्रभावित होते. हा अभ्यास एका रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये मेदूच्या अशा प्रोटेक्टिव्ह प्रोटीनला एनालिसिस केले ज्याचा स्तर झोपेच्या कमतरतेमुळे कमी होतो.

संशोधकांनी असे म्हटले की, प्लियोट्रोफिन किंवा पीटीएन नावाचे प्रोटीन हडांचा विकास, सूज आणि कँन्सर मेटास्टेसिस सारख्या फंक्शनमध्ये मोठी भुमिका बजावते. काही संशोधकांना असे आढळून आले की, कमी पीटीएनमुळे मेंदूतील हिप्पोकॅम्प्स कोशिका मृत होऊ लागतात. पीटीएन अल्जाइमर आणि अन्य न्युरोडीजेनेरेटिव रोगांशी संबंधित आहे. त्यांनी असे म्हटले की, झोप आपली स्मरणशक्ती उत्तम ठेवणे आणि शिकण्याची क्षमतेत महत्त्वपूर्ण भुमिका निभावते. झोपेच्या कमतरतेमुळे योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती प्रभावित होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा- शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे

- Advertisment -

Manini