रोज ५ बदाम खाल्ल्यानं होतात फायदे

रोज ५ बदाम खाल्ल्यानं होतात फायदे

प्रातिनिधिक फोटो

बदाम खाणं शरीराला चांगलं असतं हे नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. पण रोज भिजवलेले ५ बदाम खाऊन शरीराला काय फायदा होतो याची तुम्हाला माहिती आहे का? बदामातून मिनरल्स, विटामिन्स आणि फायबरचा शरीराला पुरवठा होतो. त्यामुळं रक्तदाबापासून ते वजन वाढण्याच्या सर्व समस्यांपासून सुटका होऊ शकते. तर ह्रदयाचे आजार असलेल्या लोकांसाठीदेखील हे बदाम फायदेशीर आहेत. भिजलेले बदाम खाल्ल्यानं नक्की काय फायदे होतात जाणून घेऊया.

१. तणावापासून होते मुक्तता – बदामापासून मिळणाऱ्या अँटीऑक्सीडंटमुळं तणावापासून मुक्तता मिळते. तर रोज बदाम खाल्ल्यामुळं डोक्याला शांतता आणि ताजेतवानेपणा मिळतो. डिप्रेशन होण्याची शक्यता नसते. पण जास्त बदाम खाल्ल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ५ पेक्षा अधिक बदाम रोज खाऊ नयेत.
२. मधुमेह आटोक्यात – मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी बदाम हे अतिशय उपयुक्त आहेत. यामधील प्रोटीन, फायबर आणि मॅग्निशियममुळं मधुमेही लोकांना फायदा होतो. इन्शुलिनची मात्रा नियंत्रणात राहण्यासाठी बदाम उपयुक्त असतात.
३. ह्रदयाच्या आजारांवर उपयुक्त – ह्रदयाचा आजार असणाऱ्या लोकांना बदाम खाण्याचा फायदा होतो. रोज ५ बदाम खाल्ल्यामुळं शरीरातील अल्फा १ एचडीएलची पातळी वाढते, ज्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
४. हाडं मजबूत होतात – सुके अथवा भिजलेले बदाम खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असल्यामुळं हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते.
५. वजन कमी होतं – तुमचं वजन जास्त असल्यास, बदाम खाल्ल्यामुळं तुमची भूक नियंत्रणात राहते. त्यामुळं जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
६. त्वचेला तकाकी येते – बदामामध्ये विटामिन ई असतं. त्यामुळं त्वचेला तकाकी येते. तसंच त्वचेची समस्या यामुळं दूर होते आणि स्वस्थ राहते.
७. बद्धकोष्ठता – बदाम खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. जेवण पचण्यासाठी बदामाची मदत होते. रोज ५ बदाम खाऊन झाल्यानंतर १ ग्लास पाणी प्यावं. त्यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. शिवाय पोटातील कँन्सर होण्याचा धोकाही यामुळं टळतो.

First Published on: July 12, 2018 1:15 PM
Exit mobile version