Periods मध्ये तुम्हाला ब्राऊन ब्लड फ्लो होतोय का?

Periods मध्ये तुम्हाला ब्राऊन ब्लड फ्लो होतोय का?

काही वेळेस पीरियड्सवेळी ब्लडचा रंग चमकदार लाल रंगाचा असू शकतो. काही वेळेस तो अगदी गडद लाल ही असतो. परंतु काही वेळेस तो काळा ही दिसतो. परंतु असा ब्लड फ्लो असणे सर्वसामान्य आहे का? पीरियड्सेळी ब्लडचा रंग नक्की का बदलतो याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पीरियड्सचा रंग प्रत्येक मासिक पाळीवेळी बदलू शकतो आणि हे सर्वसामान्य आहे. ब्लडचा रंग बदलण्यामागे काही कारणं असतात. परंतु तुम्हाला त्या बद्दल माहिती असणे फार गरजेचे आहे.

पीरियड्स मधील रंग बदलण्यामागील कारण नक्की काय?
याचे एक कारण रक्ताचे ऑक्सिडाइज होणे. खरंतर आपल्या शरिरातील हिमग्लोबिनच्या स्तरावर निर्धारित असते की, रक्ताचा रंग कसा असेल. हिमग्लोबीन रक्तात असलेल्या Iron चे समृद्ध असलेला एक घटक असतो. हाच शरिरात ब्लड फ्लोसाठीसुद्धा जबाबदार असल्याचे मानले जाते.

Iron च्या कारणास्तव ब्लडचा रंग बदलतो
आयरन जसा हवा आणि पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्यात ऑक्सिडाइजेशन सारखी प्रोसेस होण्यास सुरुवात होते. हेच कारण आहे की, हवा आणि खासकरुन ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या ब्लडचा रंग बदलला जातो.

जर तुम्ही कधी नोटीस केले असेल की, पीरियड्स जेव्हा येतात तेव्हा त्याचा सुरुवातीला रंग लाल चमकदार असतो. परंतु दिवस पुढे जातात तेव्हा त्याच्या रंगात बदल होऊ लागतो. याचे कारण असे सुद्धा असू शकते की, सुरुवातीला आणि हेवी फ्लो असतो त्यादिवशी अधिक वेगाने ब्लड शरिरातून बाहेर येते. याच दरम्यान लाल रंगाच्या गुठळ्या सुद्धा काहीवेळेस बाहेर पडतात. खरंतर प्रेग्नेंसीपूर्वी, प्रेग्नेंसी नंतर, मेनोपॉज दरम्यान औषधांच्या परिणामांमुळे पीरियड्सच्या ब्लडचा रंग बदलला जातो.


हेही वाचा- Period Tracker: व्हॉट्सअॅपवर अशी ट्रॅक करता येईल पीरियड्सची तारीख

First Published on: May 16, 2023 1:11 PM
Exit mobile version