अनेक आजारांवर चेरी आहे रामबाण

अनेक आजारांवर चेरी आहे रामबाण

चेरी हे फळ दिसायला जरी खूप छोटे असले तरी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. चेरीमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि बीटा केरोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह आदी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेरी खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

चेरी खाण्याचे फायदे

हृदयरोगासाठी चेरी खूप लाभदायी आहे. चेरीमध्ये झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मँगनिज ही तत्वे असतात, जी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे चेरी हे फळ हृदयरोगासाठी आरोग्यदायी आहे.

चेरीमध्ये 75% पाणी असतं आणि विशिष्ट प्रकारचे विरघळणारे फायबर असतात. चेरीतील फायबर हे शरीरातील फॅट्स शोषून घेतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.

निद्रानाशाचा त्रास असल्यास दररोज सकळी आणि संध्याकाळी चेरीचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळते.

चेरीमध्ये व्हिटामिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडन्टस् असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. चेरी नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. चेरीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते.

चेरीमध्ये अँथोसायनीन नावाचं रसायन असतं. जे अँटिऑक्सिडन्टप्रमाणे काम करतं. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.

चेरीमध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील सोडिअमची मात्रा कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

 

चेरीमध्ये अँथोसायनिन नामक रसायन असतं. जे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढविण्यात मदत करतं. त्यामुळे डायबेटिस पेशंटनी चेरी आवर्जून खावी.

याव्यतिरिक्त चेरीडायरिया, अस्थमा या रोगांसाठी सुद्धा लाभदायक आहे. चेरी हे फळ डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते. मळमळत असल्यास किंवा उलटी आल्यास चेरी खाल्ल्याने आराम मिळतो.


हेही वाचा :

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे

First Published on: September 7, 2023 6:23 PM
Exit mobile version