Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthशरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे

Subscribe

एनीमिया हा एक ब्लड डिसऑर्डर आहे. या आजाराच्या कारणास्तव शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. मात्र महिलांमध्ये एनीमिया होण्याची प्रकरणे अधिक आहेत. ब्लड मध्ये रेड सेल्स आणि हिमग्लोबीनचा स्तर कमी झाल्याने हा आजार होतो. डाएटकडे लक्ष न दिल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो. खासकरुन डाएटमध्ये फोलिक अॅसिड आणि लोहाच्या कमतरतेमुळे आजार होतो. महिलांमध्ये प्रेग्नेंसीदरम्यान एनीमियाची प्रकरणे अधिक दिसतात.

एनीमियाच्या कारणास्तव थकवा, डोके दुखी आणि भूक कमी लागणे अशी लक्षणे दिसून येतात. जर एखाद्या महिलेला या समस्या होत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास तर जीवावर बेतू शकते.

- Advertisement -

जर प्रेग्नेंसी दरम्यान एनिमिया झाल्यास बाळाच्या आरोग्यावर ही परिणाम होऊ शकते. हा आजार जेनेटिक ही असू शकतो. त्यामुळे याला हलक्यात घेऊ नये.

Functions of blood: transport around the body - NHS Blood Donation

- Advertisement -

गंभीर असू शकतात लक्षणे
डॉक्टर असे म्हणतात की, एनीमियाच्या कारणास्तव महिलांचे आरोग्य बिघडले जाते. यामुळे अन्य काही आजार ही होऊ शकतात. शरीरात लोहाची, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे क्रॉनिक डिजीजच्या कारणास्तव एनीमिया आजार होऊ शकतो. काही महिलांमध्ये एनीमियाची लक्षणे अधिक गंभीर दिसून येऊ शकतात. या दरम्यान, तोंड येणे, स्किन पिवळी पडणे, डोळे निळे होणे आणि चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बहुतांश प्रकरणांमधअये हिमग्लोबीनच्या कारणास्तव एनीमिया होऊ शकतो. अशातच डाएटकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या फूड्सचा डाएटमध्ये करा समावेश
रक्ताची कमतरता तुम्ही नैसर्गिक रुपात दूर करू पाहत असाल तर डाएटमध्ये मनुका, अंजीर, काजू, आक्रोड, अंडी, व्हिटॅमिन बी युक्त भोजनाचा समावेश करा. या व्यतिरिक्त फोलिक अॅसिड ही गरजेचे आहे. एनीमियाच्या आजारापासून दूर राहण्यासाठी डाएटमध्ये फोलिक अॅसिड घेणे गरजेचे आहे. यासाठी पालक, ब्रोकली, बीन्स, शेंगदाण्याचे सेवन करावे.


हेही वाचा- तुमच्या ब्लड ग्रुपनुसार निवडा योग्य आहार

- Advertisment -

Manini