Coconut oil benefits : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल रामबाण उपाय; ‘या’ पद्धतीने वापर करा

Coconut oil benefits : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल रामबाण उपाय; ‘या’ पद्धतीने वापर करा

सध्या वाढणारं प्रदूषण, बदललेली इल्फस्टाईल(lifestyle) आणि खाण्या – पिण्याच्या सवाई या सगळ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अशातच स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. या सगळ्याचा परिणाम जसा शरीराव होतो तसाच तो केसांवरही होतो. केस निरोगी ठेवण्यासाठी केसांची काळजी घेणे अत्यंत उर्जेचे असते. खोबरेल तेल केसांसाठी उत्तम समजले जाते. केसांना गरजेचे असलेले सर्व पोषक घटक खोबरेल(coconut oil benefits) टेलमधून मिळते. त्यामुळे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो आणि तो फायदेशिरही ठरतो.

हे ही वाचा – पुण्यातील ‘डिस्को’ भजी नेमकी आहे तरी कशी? कृतीसह जाणून घ्या

लांब आणि दाट केस(good hair) सर्वांचा आवडतात. पण आजकाल केसांसाठी केमिकलने बनविलेली उत्पादने वापरण्यात येतात. पण त्यांच्या वापराने केस निर्जीव आणि कोरडे होतात. पण नारळाचे पदार्थ केसांसाठी खूप उपयुक्त असतात. नारळ मध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे केसांमध्ये असलेली पीएच ची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. खोबरेल तेल केसांना नैसर्गिक रित्या पोषण मिळवून देते. पण खोबरेल तेलाचा नेमका वापर कसा कराव ते जाणून घेऊया.

हे ही वाचा – ब्युटी प्रॉड्स्टस खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

– निरोगी केसांसाठी नारळ शॅम्पूचा वापर करा

केसांचा पीएच ३.७  एवढा असतो तर बाजारात मिळाऱ्या बहुतांश शॅम्पू मध्ये पीएच चं प्रमाण ५. ५ एवढ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते केसांसाठी हानिकारक असते. यालाच पर्याय म्हणून नारळ शॅम्पूचा करता येईल. त्याने केस निरोगी आणि मजबूत होतात.

– खोबरेल तेल आणि कोरफड मसाज 

एक काप खोबरेल तेल आणि कोरफडीचा गर घ्या हे मिश्रण एकत्र करून त्याने केसांना हलक्या हाताने मसाज करा. खोबरेल तेल आणि कोरफड या दोघांमधील पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. याने मसाज केल्याने केसांमधील घाण निघून जाईल. त्याचबरोबर टाळू वर मसाज केल्याने रक्ताभिसरणंही सुधारण्यास मदत होते. हे मिश्रण २० मिनिटे केसांना लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने केस धुवा.

हे ही वाचा – थंड दूध पिणंही आरोग्यदायी आहे, ‘हे’ आहेत फायदे

– कोंडा घालविण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर 

खोबरेल तेलाचा वापर केल्याने कोंड्याची समस्या सुद्धा दार होते. अर्धा कप नारळाचे दूध, त्यात तुमच्या केसांनुसार योग्य असा माईल्ड शॅम्पू, ग्लिसरीन आणि चार चमचे खोबरेल तेल. हे सर्व पदार्थ एकत्र करून केसांना लावल्याने केसांमधील कोंडा दूर होतो. हे मिश्रण तुम्ही एका वेळी बनवून ते फ्रिज मध्ये ठेऊन  २ ते ३ वेळा वापरू शकता.

हे ही वाचा – Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

या संबंधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेणे गरजेचे आहे.

First Published on: August 2, 2022 11:10 AM
Exit mobile version