घरलाईफस्टाईलब्युटी प्रॉड्स्टस खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

ब्युटी प्रॉड्स्टस खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Subscribe

सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घेतली तर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो.

त्वचा निरोगी आणि चमकदार व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यात येतो. हल्ली बाजारात अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधनं(beauty tips and products )आलेली आहेत. पण नेमकं यातलं कोणतं प्रॉडक्ट आपल्या त्वचेसाठी योग्य आहे हे ओळखणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो.

आणखी वाचा – Workout Tips: व्यायाम करायला तासनतास वेळ नाही? २ मिनिटांच्या ‘या’ टिप्सने ठेवा…

- Advertisement -

 

आणखी वाचा –  फ्रीजमधून येत असेल दुर्गंधी तर वापरा ‘या’ टिप्स

- Advertisement -

प्रत्येकालाच सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. त्यासाठी त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. त्वचेला योग्य पोषण मिळणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. त्यासाठी आहारातही योग्य त्या अन्नपदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते. आपण जो आहार घेतो त्या आहारमधूनच आपलय तवचेला योग्य ते पोषक घटक मिळत असतात. आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं ताज अन्न खाल तेवढीच तुमची तुमची त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार बनत जाते. योग्य आहार घेण्यासोबतच तुम्ही कोणते ब्युटी प्रॉडक्ट्स(beauty tips and products ) वापरता हे सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्या त्वचेशी अनुरूप असलेले ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं आवश्यक आहे.

आणखी वाचा – थंड दूध पिणंही आरोग्यदायी आहे, ‘हे’ आहेत फायदे

आणखी वाचा – Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

काही जणांचा असाही समज असतो की जास्त महाग ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले तर अधिक सुंदर दिसाल पण हे चुकीचे. तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे त्यानुसार तुम्ही कोणते ब्युटी प्रॉडक्ट्स वापरावेत हे महत्वाचं असतं.

१. पॅच टेस्ट करा.

कोणतंही ब्युटी प्रॉडक्ट खरेदी केल्यावर त्याची हातावर किंवा मानेवर पॅच टेस्ट करा. त्यामुळे ते उत्पादन तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही तर तुम्हाला कळेल. जर का त्या प्रॉडक्टचे चांगले परिणाम दिसत असतील तरच तर प्रॉडक्ट तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

आणखी वाचा – दह्यासोबत ‘हे’ ५ पदार्थ खाणे टाळा, फायद्याऐवजी होईल तोटा

२. गैरसमज दूर करा.

सध्या बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आली आहे. प्रत्येक जण आपल्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करत असतो त्यामुळे जाहिरातीवर भुलून कोणतंही उत्पादन खरेदी करण्यापेक्षा तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे याचा विचार करून सौंदर्य प्रसाधनं खरेदी करा.

३. कोणत्या वयात कोणती उत्पादने वापरावीत.

तुमच्या त्वचेचा जो प्रकार आहे त्यानुसार तुम्ही सौंदर्य प्रसाधनं वापरणं गरजेचं असतं. साधारणपणे वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत त्वचा तेलकट असते. त्यामुळे अश्या व्यक्तींनी वॉटर बेस्ड प्रॉडक्ट वापरावीत. तर २५ ते ३० वय वर्षे असणाऱ्या व्यक्तींनी मॉइश्चराइज करणारे प्रॉडक्ट वापरावेत. जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि जर तुम्हाला मुरुमं येण्याची समस्या सुद्धा असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड प्रॉडक्टचा(beauty tips and products ) वापर करावा. त्याचबरोबर ज्यांची त्वचा ड्राय आहे. त्यांनी क्रीम आणि मॉइश्चराइज प्रॉडक्टचा वापर करावा.

 

वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -