वाढत्या वयाचा प्रभाव केवळ आरोग्यावरच नव्हे तर तुमच्या त्वचेवर देखील होतो. त्यामुळेच महिला असो किंवा पुरुष मंडळी त्वचेसंदर्भातील काही ट्रिटमेंटचा आधार घेतात. परंतु शरिरात दोन अशी पोषक तत्व असतात जी नेहमीच आपल्याला चिरतरुण दिसण्यास मदत करु शकतात. परंतु आपण त्याकडे लक्ष ही देत नाही आणि आपल्याला त्याबद्दल माहिती सुद्धा नसते. ही दोन्ही पोषक तत्व एक प्रकारचे प्रोटीन्सच असतात. त्याच्या कमतरतेमुळे व्यक्ती वेळेआधीच वृद्ध दिसू लागतो. असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या डाएटमध्ये जरुर समावेश केले पाहिजेत. ज्यामुळे तुम्ही चिरतरुण दिसाल.
चिरतरुण दिसण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ
- दही
तुमच्या आहारात नियमित दह्याचे सेवन करा. प्रत्येकाच्या घरात दही असतंच. दह्याच्या सेवनानं अनेक गुणकारी फायदे आपल्या शरीराला होतात. यामध्ये चांगले बॅक्टेरिया शरीरासाठी तसेच त्वचेसाठी अत्यंत उपयोगी आहे.
- कलिंगड
कलिंगडामध्ये लायकोपेन असते, ज्यामुळे त्वचा तजेलदार होते. तसेच युव्ही किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्याचे कामही कलिंगडातील लायकोपेन करते.
- काकडी
रोजच्या आहारात काकडीचा समावेश केल्यास त्वचेचा तजेलपणा टिकून राहतो. काकडीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असते जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.
- अॅव्होकॅडो
ओमेगा 9 फॅटी अॅसिडचा मोठा स्त्रोत म्हणजे अॅव्होकॅडो फळ. त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी, त्वचा मुलायम बनवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आहारात अॅव्होकॅडो फळाचा नक्की समावेश करा.
- डाळिंब
डाळिंब प्रौढावस्थेतील समस्या दूर करते आणि कामाच्या वेळी येणार्या तणावातही लाभदायक ठरते. त्यामुळे चिरतरुण दिसायचे असेल तर डाळिंबाचा आहारात हमखास समावेश करायला विसरू नका.