घरमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींनी फडणवीसांना समज द्यावी; लाखोंच्या जाहीर सभेत जरांगे पाटलांची मागणी

पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना समज द्यावी; लाखोंच्या जाहीर सभेत जरांगे पाटलांची मागणी

Subscribe

जालना : अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाची मोठी सभा पार पडली. 100 एकर जमिनीवर या भव्य सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा सरकारला इशारा दिला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे. (Prime Minister Narendra Modi should understand Devendra Fadnavis Manoj Jarange Patils demand in a public meeting of lakhs)

हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण हवं, ते दिलं नाही तर… जरांगेंचा एल्गार; फक्त 10 दिवस…

- Advertisement -

मनोज जरांगे पाटलांना तातडीने अटक करण्याची मागणी वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केली होती. याचपार्श्वभूमीवर बोलताना आजच्या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना यश मिळवायचं होतं, त्यांनी एक मराठा लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांचं भलं होत असताना एक टरमळं उठून मी हिंसा घडवणार असं काहीतरी वेगळंच म्हणतोय आहे. आता मला अटक करणं हे इतकं सोपं आहे का? असा सवाल उपस्थित करताना मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणार हाच आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते याला समज द्यावी. कारण तो तुमचा कार्यकर्ता आहे. तुम्ही मराठ्यांना अंगावर घेऊ नका, कारण याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत हे विसरु नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना माजी विनंंती आहे की, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. कारण ते त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगावर घालत आहेत. परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि फडणवीसांना सांगायचं आहे की, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, मग बघा हेच कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करणं देवेंद्र फडणवीस यांनी बंद करावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे झाले तर आम्ही ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येतो, असे जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली, परंतु मला…; धमकी देणाऱ्यांना भुजबळांकडून जोरदार प्रत्युत्तर

मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा…

मराठा समाजाला मी सांगू इच्छितो, आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारकडे मुदत आहे. आपलं आंदोलन शांतेत होईल, पण आरक्षणही तुम्हाला मिळणार आहे. शांततेच्या आंदोलनामुळेच मराठा समाज एकवटला आहे. त्यामुळे मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा 22 तारखेला ठरवणार आहे. आज सरकारला विनंती आहे की, लाखांनी जमलेल्या मराठा समाजाची भावना त्यांनी लक्षात घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -