घरताज्या घडामोडीमनोज जरांगे पाटलांचा एक इशारा अन् रुग्णवाहिकेची वाट मोकळी; वाचा नेमकं काय...

मनोज जरांगे पाटलांचा एक इशारा अन् रुग्णवाहिकेची वाट मोकळी; वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी संवाद यात्रा काढली होती. या संवाद यात्रेची सांगता जालन्यातील आंतरवाली सराटी येथे आयोजित सभेने झाली. या सभेला हजारोच्या संख्येने मराठा समाजाच्या बांधवांनी गर्दी केली होती. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी संवाद यात्रा काढली होती. या संवाद यात्रेची सांगता जालन्यातील आंतरवाली सराटी येथे आयोजित सभेने झाली. या सभेला हजारोच्या संख्येने मराठा समाजाच्या बांधवांनी गर्दी केली होती. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील बोलत असताना अचानक आरोग्य सेवेची गरज भासल्याने सभास्थळी रुग्णवाहिका आणावी लागली. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावरून रुग्णवाहिकेसाठी तात्काळ वाट मोकळी करून देण्याची आवाहन नागरिकांना केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत शनिवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास मनोज जरांगे यांच्या सभेला सुरूवात झाली. यावेळी सभा सुरू असताना अचानक आरोग्य सेवेची गरज भासल्याने सभास्थळी रुग्णवाहिका आणावी लागली. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावरून रुग्णवाहिकेसाठी तात्काळ वाट मोकळी करून देण्याची आवाहन नागरिकांना केलं. मनोज जरांगे यांच्या मागणीला मराठा बांधवांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि अवघ्या काही मिनीटांत रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन गर्दीतून वाट काढत सभास्थळाहून बाहेर पडली. आरोग्य यंत्रणेकडून आरोग्य सेवा पुरवण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – भुजबळांसहित सदावर्तेंनाही सुनावलं; उपमुख्यमंत्र्यांनी अशी येडपटं पाळलीच कशी? जरांगेंचा सवाल

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. ‘बघा बरं लोकं म्हणतात की मराठे वाट देत नाहीत, मराठ्यांनी दणादण वाट करुन दिली’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान सभास्थळी उपस्थित रुग्णवाहिकेत पेशन्टला बाहेर नेण्यात आलं.

- Advertisement -

आरोग्याची समस्या उद्भवल्यास सभास्थळी आरोग्य सेवेची व्यवस्था देखील करण्यात आली होती. तसेच, या सभेसाठी मोठी तयारी करण्याता आली होती. सभेच्या ठिकणी १०० एकरहून अधिक जागेची व्यवस्था आणि पार्किंगची देखील सोय करण्यात आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -