Health Tips : ‘या’ हेल्दी पदार्थांचे सेवन करुन ठेवा बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

Health Tips : ‘या’ हेल्दी पदार्थांचे सेवन करुन ठेवा बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

बॅड कोलेस्ट्रॉलला एक सायलेंट किलर म्हटले जाते. कारण हे ज्यावेळी आपल्या रक्तात जमा होते तेव्हा रक्तप्रवाहात अडथळे करते. त्यामुळे आपल्याला रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, वजन वाढणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी हेल्थ एक्सपर्ट्सने दिलेल्या सल्ल्यानुसार, तुम्ही तुमच्या दररोज आहारात काही बदल करुन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेऊ शकता.

बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणात कसे ठेवाल?

 

दररोजच्या आहारात फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्याने त्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणात ठेवता येते.

अनेकजण दिवसातून 4-5 वेळा चहा पितात. यातील जास्त प्रमाणातील साखरेमुळे देखील शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. अशावेळी तुम्ही ग्रीन टी पिऊन वाढतं वजन आणि बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेऊ शकता.

रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात सोयाबीनचे सेवन करा कारण यामध्ये अँटीऑक्सिडेंट असते.

हेल्दी पदार्थांसोबतच बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणात ठेवण्यासाठी मसाल्यांचे देखील सेवन करायला हवे. यामध्ये तुम्ही आलं, लसूण, दालचीनी, हळद यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा.

 


हेही वाचा :

वर्कआऊटनंतर प्रोटीन शेक घेणे आरोग्यासाठी धोकादायक

First Published on: March 13, 2023 4:45 PM
Exit mobile version