सुदृढ आरोग्यासाठी असा असावा डाएट प्लॅन

सुदृढ आरोग्यासाठी असा असावा डाएट प्लॅन

Diet

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लॅन बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लॅन बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लॅन फिक्स करा आणि बॉडी बनवा.

ब्रेकफास्ट सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा. त्यासाठी ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास कोमट दूध किंवा एक कप चहा किंवा एक कप कॉफी किंवा ताजा रस यासोबत एक प्लेट पोहे किंवा उपमा, दोन अंडी आम्लेट किंवा दोन उकडलेली अंडी अथवा जॅम वा बटरसोबत तीन ब्राऊन ब्रेड स्लाइस.

दुपारचे जेवण दुपारचे जेवण हे सर्वसमावेशक असावे. यात गोड दही एक वाटी, 2-3 चपात्या, एक वाटी भात, हिरव्या भाज्या, डाळ, सलाड

संध्याकाळचे स्नॅक्स दुपारचे जेवण योग्य वेळेत घेतल्यास संध्याकाळच्या सुमारास थोडीफार भूक लागतेच. अशावेळी जड पदार्थ खाण्यापेक्षा दोन स्लाईस ब्राऊन ब्रेड तसेच एक ग्लास बनाना शेक किंवा कस्टर्ड अ‍ॅपल किंवा मँगो शेक अथवा एक कप चहा किंवा कॉफी घेऊ शकता.

रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण फार कमी घ्यावे. रात्रीच्या जेवणात एक बाऊल दही, तसेच १-२ चपात्या, सुकी भाजी, एक बाऊल डाळ, एक प्लेट सलाड. रात्री जेवल्यानंतर १५-२० मिनिटांनंतर मीठ आणि साखरेशिवाय कोमट लिंबूपाणी प्यावे.

तसेच जेवल्यानंतर दोन ते अडीच तासांनी झोपावे. कारण या काळात जेवण चांगले पचते. तसेच पचनसंबंधी समस्या दूर होतात.

सौंदर्यवर्धक काकडी

काकडी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी चेहर्‍यावर चमक आणते. काकडीपासून आपण घरच्या घरी फेस पॅक तयार करु शकतो. बघूया चमकदार त्वचेसाठी काकडीचे काही घरगुती फेस पॅक

First Published on: September 21, 2018 1:09 AM
Exit mobile version