Tuesday, May 14, 2024
घरमानिनीBeautyघरच्या घरी सोप्या पद्धतीने करा फेस क्लिनअप

घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा फेस क्लिनअप

Subscribe

सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबणाने किंवा फेस वॉशने चेहरा स्वच्छ केला जातो. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहे. ज्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ दिसेलच शिवाय सुंदरही दिसेल.

 असे करा फेस क्लिनअप

Top 12 Ingredients Your Facial Cleanser Should Include – JUARA Skincare

- Advertisement -
  • चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य फेसवॉश किंवा क्लिंजर वापरा. त्यानंतर टोनर लावा आणि चेहरा शक्यतो गार पाण्याने धुवा.
  • चेहऱ्यावरील सुक्ष्म छिद्र बुजवण्यासाठी क्लिंजिंग मिल्क कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहरा साफ करुन घ्या. नंतर चेहऱ्याला वाफ घ्या.
  • चेहऱ्याला वाफ दिल्यानंतर थंड करण्यासाठी बर्फाने मसाज करा. हा मसाज गोलाकार दिशेने करा.

Benefits Of Cleanser - Why You Should Use It

  • तुमच्या त्वचेनुसार योग्य फेस स्क्रबर निवडा. फेस स्क्रबरने 8-10 मिनिटे चेहरा साफ करा.
  • स्क्रबर चेहऱ्यावर थोडा सुकल्यानंतर चेहऱ्याला मध लावा. मधामुळे ब्रेकआउट्सचे प्रमाण कमी होते आणि त्वचा उजळते.
  • नंतर चेहरा स्वच्छ धुऊन आवडीनुसार फेस पॅक लावा. फेस पॅक पूर्ण सुकल्यावर चेहरा धुऊन टाका.
  • हळूहळू चेहरा सुकू द्या. त्यानंतर टोनर लावा. चेहऱ्याला तजेला येण्यासाठी मॉइश्चरायजर लावा. यामुळे तुमचा चेहरा उजळेल.

हेही वाचा :

Coconut Benefits : त्वचेसाठी वरदान आहे नारळाचे दूध; ‘या’ 3 पद्धतीने करा वापर

- Advertisment -

Manini