संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Arthritis

एखाद्याला घोरण्याबद्दल सतत चिडवलं जातं. मस्करीला सामोरं जावं लागतं. चार चौघातही टीका सोसायला लागते. पण हसून दुर्लक्ष करण्याएवढा हा विषय साधा नाही. कदाचित हा एखाद्या मोठ्या दुखण्याचा संकेत असू शकतो असं नुकतेच एका संशोधनातून समोर आलं आहे.

शांत झोपेत श्वासाचा थोडाफार आवाज येणं नैसर्गिक आहे. मात्र, दुसर्‍याची झोप उडवेल असं घोरणं दुर्लक्ष करण्यायोग्य नाही. कदाचित हे संधिवाताचे लक्षण असू शकेल. हा एक हाडासंबंधी आजार आहे. ही व्याधी अपंग बनवणारी आहे. काही प्रसंगी पेशंट बेडवरून उठूदेखील शकत नाहीत. साधारणत: २० ते ५० वयोगटातील महिला या व्याधीनं प्रभावित होऊ शकतात. यामुळे स्नायूमधील ताकद कमी होते आणि लवचिकता कमी झाल्यानं व्यक्ती पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू शकत नाही. या व्याधीत शरीरात काही घातक द्रव्य तयार होतात. ही द्रव्ये स्नायूंमधील रसायनांवर हल्ला करतात आणि त्यामुळे संबंधित स्नायूभोवतालची जागा लाल आणि गरम होते. याबरोबरच असह्य वेदनाही सुरू होतात.

रोगाच्या पहिल्या अवस्थेमध्ये थकवा, भूक कमी होणं, घोरण्याचं प्रमाण वाढणं आदी लक्षणं दिसतात. कालांतरानं हातपायावर सूज, हातपायाची बोटं सुजणं, कोपरावरील सूज आणि सांधेदुखी सुरू होते. काही दिवसातच हातपायांची हालचाल कमालीची वेदनादायी ठरते आणि छोटी-मोठी कामंही अशक्य होऊन बसतात. म्हणूनच वेळेवर लक्षणं ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

First Published on: November 8, 2018 12:10 AM
Exit mobile version