Friday, May 10, 2024
घरमानिनीHealthमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'या' 3 प्रकारचा चहा पिणं फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘या’ 3 प्रकारचा चहा पिणं फायदेशीर

Subscribe

शरीरातील साखरेच्या अनियंत्रमामुळे मधुमेह अधिक बळावतो आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे अशा विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याकडेही व्यवस्थिक लक्ष द्यावे लागते. मात्र, तुम्ही देखील वाढत्या शुगरमुळे वैतागला असला तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चहांचा समावेश करु शकता. ज्यामुळे शरीरातील शुगरचे प्रमाणही नियंत्रणात राहिल आणि इम्युनिटी सिस्टमही अधिक मजबूत होईल.

मधुमेहींसाठी चहाचे प्रकार

  • दालचिनी चहा

A Cinnamon Tea Recipe With Honey and Optional Spices

- Advertisement -

दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मधुमेहासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण नियमितपणे दालचिनी चहा बनवू पिऊ शकतात.

  • ग्रीन टी

What green tea can do for you? – Derma Essentia

- Advertisement -

औषधी गुणांनी युक्त असलेली ग्रीन टी केवळ वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर नाही तर शरीरातील साखरचे प्रमाणही नियंत्रित करते. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनीयुक्त ग्रीन टी शरीरातील जळजळ आणि पेशींचे नुकसान कमी करते, तसेच इंसुलिनची पातळी नियंत्रित करते.

  • जास्वंदीचा चहा

5 Amazing Health Benefits of Hibiscus Tea – Naturally Yours

 

जास्वंदीचा चहाला हिबिस्कस चहा म्हणूनही ओळखला जाते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा शरीरास खूप फायदेशीर मानला जातो. या चहाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहून कोलेस्टेरोलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. या चहाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असून, चयापचय शक्ती देखील सुधारते.

 


हेही वाचा :

‘या’ 5 देशी पदार्थांचे अधिक सेवन केल्याने वाढू शकते वजन

- Advertisment -

Manini