घरमहाराष्ट्रBhalchandra Nemade : केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? भालचंद्र नेमाडेंचा थेट...

Bhalchandra Nemade : केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? भालचंद्र नेमाडेंचा थेट सवाल

Subscribe

जळगाव शहरातील जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा (बुधवारी 17 जानेवारी) पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एक मोठं विधान केलं आहे. रामायण अनेक प्रकारची आहेत. तेव्हा केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर राम काय खात होते असं बोलणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. (Bhalchandra Nemade How can only Valmikis Ram be considered real Direct question of Bhalchandra Nemande)

जळगाव शहरातील जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा (बुधवारी 17 जानेवारी) पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले की, लेखकांनी सत्य कशा पद्धतीने मांडले पाहिजे हे सांगताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केलं. राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे टीव्ही, भाषण या माध्यमातून सत्य कळणार नाही किंवा त्यावर कशासाठी चर्चा करायची? असेही त्यांनी यावेळी परखड मत व्यक्त केलं.

हेही वाचा : Arvind Kejriwal ED Summon: ईडीच्या समन्सवर केजरीवाल थेटच बोलले; निवडणुकीपूर्वी मला…

- Advertisement -

सगळ्यांचा राम वेगळा

यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले की, बरं एकच रामायण आहे का? वेगवेगळ्या लिखित रामायणामध्ये राम सुद्धा वेगवेगळा आहे. कंबोडियातला राम वेगळा आहे, जैन रामायणातला राम वेगळा आहे, काही ठिकाणी सीता ही रामाची बहीण आहे. काही ठिकाणी सीता ही रावणाची मुलगी आहे, अशा पद्धतीने अनेक युगांमधून बदलून वाल्मिकीच्या काळातलं रामायण आपण वाचतो. केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केला आहे.

हेही वाचा : Mano Jarange Patil : राज्यातील 54 लाख कुणबींना मिळणार प्रमाणपत्र; अंमलबजावणी कधी होणार?

थ्री हंड्रेड रामायण नावाचं पुस्तक बंद पाडलं

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले की, लेखकांनी सत्य कसं शोधलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रभू राम आणि रामायणाचं उदाहरणं दिलं. राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? साहित्यिकाने खोलात जाऊन ते शोधलं पाहिजे. त्याच पद्धतीने एकच रामायण नाही, वेगवेगळ्या लिखित रामायणमध्ये सुद्धा राम हा वेगळा होता. ‘थ्री हंड्रेड’ रामायण नावाचे पुस्तक रामार्जून यांनी लिहिलं त्यात राम हा वेगळा होता. ते पुस्तक बंद पाडलं अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. थ्री हंड्रेड रामायण का वाचू देत नाही लोकांना… ते पुस्तक का नाही मिळत? असाही सवाल यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित करत मला खूप काही सांगायचं होतं, पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्यं करणं टाळलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -