शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप

शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप

शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप

सध्या बाजारात शेवग्याच्या शेंगा दाखल झाल्या आहेत. बऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे.

साहित्य

५ – ६ कोवळ्या शेवगच्या शेंगा
अर्धी वाटी शेवग्याची कोवळी पाने
४ – ५ लसूण पाकळ्या
आलचा तुकडा
एक चमचा तांदूळपिठी
मीठ
२ वाट्या गोड ताक

कृती

आले, लसूण, कोथिंबीर एकत्र बारीक वाटावे. शेंगा सोलून त्याचे तुकडे करावेत. कोवळी पाने, शेंगा वेगवेगळे उकडून घ्यावे. शेवगची पाने तांदूळ पिठी, ताक, मीठ, चिमूटभर साखर सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवावे. एक चमचा तुपाची जिरे घालून फोडणी करावी आणि ताकात घालावी. शेंगा घालून सूप चांगले उकळावे. अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप तयार.

First Published on: March 6, 2020 7:39 PM
Exit mobile version