असा दूर करा त्वचेचा ‘कोरडेपणा’

असा दूर करा त्वचेचा ‘कोरडेपणा’

असा दूर करा त्वचेचा 'कोरडेपणा'

अनेकांची त्वचा कोरडी असते. अशावेळी काय करावे हा प्रश्न पडतो. अशातच त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास त्वचा नरम राहण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑईल

कोरडी त्वचा असल्यास ऑलिव्ह ऑईलने मालीश करावे. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यात मदत होते.

पपई

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी त्वचेवर पपईची पेस्ट करुन लावाली. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

एलोवेरा जेल

कोरड्या त्वचेसाठी एलोवेरा जेल एक रामबाण उपाय आहे. याने त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळेल आणि त्वचा उजळेल.

बदाम तेल

आपली त्वचा ड्राय असल्यास बदामाच्या तेलान शरीराला मालिश करावे. यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

दही

दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. दह्याने चेहर्‍याची मालीश करून २० मिनिटे असेच राहू द्या. याने त्वचेवरील ड्रायनेस दूर होईल. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. यामुळे नैसर्गिक ओलावा मिळेल.

First Published on: March 16, 2020 6:00 AM
Exit mobile version