श्वसनासंबंधित समस्या असेल तर अशी घ्या आरोग्याची काळजी

श्वसनासंबंधित समस्या असेल तर अशी घ्या आरोग्याची काळजी

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याचा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी रावणाचा पुतळा ही दहन केला जातो. त्यामुळे खुप आतिशबाजी केली जात असल्याने हवेचे प्रदुषण होऊ शकते. परंतु श्वसनासंबंधित समस्या असेल तर तुम्ही दसऱ्याला आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढील काही टिप्स जरुर फॉलो करा.

-ब्रिदिंग एक्सरसाइज करा


फुफ्फुस हेल्दी राहण्यासाठी आणि श्वसनाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही दररोज ब्रिदिंग एक्सरसाइज करावी. अशा प्रकारची एक्सरसाइज केल्याने फुफ्फुसाचे हेल्थ उत्तम राहते. त्याचसोबत फुफ्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले जाते.

-हाइड्रेट रहा


श्वसनासंबंधित समस्या असेल तर तुम्ही हाइड्रेट राहणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे दिवसभरातून 3-4 लीटर पाणी जरुर प्या.

-श्वसनाची समस्या ट्रिगर करणाऱ्या पदार्थांपासून दूर रहा


जर तुम्हाला श्वसनासंबंधित समस्या असेल तर अशा गोष्टींपासून दूर रहा ज्यामधून धूर निघतो. फटाके असो किंवा सिगरेट मधून निघरणारा धूर, यामुळे फुफ्फुसात जळजळ निर्माण होऊ शकते. याच कारणास्तव सीओपीडी आणि फुफ्फुसासंबंधित समस्या वाढू शकते.


हेही वाचा- गरबा खेळताय…? तर आधी हे वाचा

First Published on: October 24, 2023 3:30 PM
Exit mobile version