Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthगरबा खेळताय...? तर आधी हे वाचा

गरबा खेळताय…? तर आधी हे वाचा

Subscribe

वाढत्या वयासह हृदयाचे आरोग्य बिघडले जाणे ही सामान्य बाब आहे. परंतु अलीकडल्या काळात हार्ट अटॅकची प्रकरणे तरुणाईत सुद्धा दिसून येत आहेत. खरंतर ही एक गंभीर बाब आहे. अखेर तरुणांमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणे का वाढली आहेत याच बद्दल जाणून घेऊयात. पण जर तुम्ही सुद्धा गरब्यासाठी जात असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हेही पहा. कारण गुजरात मध्ये हार्ट अटॅकमुळे तरुणांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

गुजरातमध्ये 10 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू
गुजरातमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान गरब्यावेळी गेल्या दोन दिवसात कमीत कमी 10 लोकांचा जीव गेला आहे. मृतांमध्ये अल्पवयीन ते मीडल एज ग्रुप मधील लोकांचा समावेश आहे. त्यापैकी कमी वय असलेल्या 13 वर्षाचा मुलगा बडौदा मधील डभोई येथील होता. नुकत्याच अहमदाबाद मधील एक 24 वर्षाचा मुलगा गरबा खेळताना अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारे कपडवांज मधील एका 17 वर्षाच्या मुलाचा ही मृत्यू याच कारणास्तव झाला. हार्ट अटॅक सारखी काही प्रकरणे आहेत जी खरंच व्यक्तीला हैराण करतात.

- Advertisement -

5 Best Places To Visit In Mumbai For Dandiya And Garba This Navratri!

जर नवरात्रीच्या सहा दिवसांपूर्वीच्या स्थिती बद्दल सांगायचे झाल्यास तर 108 क्रमांकावर आपत्कालीन रुग्णवाहिका सर्विसेसला जवळजवळ 500 पेक्षा अधिक फोन आले जे हृदयरोगासंबंधित होते. त्या व्यतिरिक्त 609 फोन कॉल्स हे श्वासासंबंधित प्रकरणांशी होते. हे फोन संध्याकाळी 6 ते रात्री 2 वाजेदरम्यान रेकॉर्ड करण्यात आले. ही तिच वेळ असते जेव्हा गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

- Advertisement -

तरुणांमध्ये का वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण?
तरुणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या प्रकरणासाठी कारणीभूत त्यांची लाइफस्टाइल आणि चुकीचे खाणे-पिणे जबाबदार आहे. जर तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल केला तर अशा धोक्यांपासून दूर राहू शकता. पण तरुणांमध्ये हार्ट अटॅकसाठी नक्की कोणती कारणे कारणीभूत आहेत हे पहा.
-अनहेल्दी फूड्सचे सेवन
-फिजिकल अॅक्टिव्हिटी न करणे
-मर्यादेपेक्षा अधिक एक्सरसाइज करणे
-धुम्रपानाची सवय
-अल्कोहोल पिण्याची सवय


हेही वाचा- दीर्घायुष्य जगण्यासाठी आजच सोडा ‘या’ सवयी

- Advertisment -

Manini