सकाळचा नाश्ता : शेवयांचा उपमा

सकाळचा नाश्ता : शेवयांचा उपमा

सकाळचा नाश्ता : शेवयांचा उपमा

अगदी कमी वेळात अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता करायचा असल्यास शेवयांचा उपमा एक उत्तम पर्याय आहे.

साहित्य

शेवया
कांदा
टॉमेटो
सिमला मिरची
वाटाणे
फरसबी
गाजर
कोथिंबीर
मिरची
चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा. त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळले पाणी गाळून घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला. वरून शेवया घाला आणि नीट एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून नीट शिजवून घ्या. वरून कोथिंबीर घाला आणि चहासोबत गरमागरम खायवा घ्या.

First Published on: June 3, 2020 6:01 AM
Exit mobile version