Friday, September 29, 2023
घर मानिनी Health रोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने होतात 'हे' 7 शारीरिक बदल

रोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने होतात ‘हे’ 7 शारीरिक बदल

Subscribe

शेंगदाण्याला गरिबांचा बदाम म्हटलं जातं. बदामाच्या तुलनेत शेंगदाणे स्वस्त असतात. मात्र, बदामामध्ये असणारे सर्व पौष्टिक घटक शेंगदाण्यात देखील असतात. शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, जे शारीरिक वाढीसाठी उपयुक्त आहेत. रोज शेंगदाणे खाणं तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे. दररोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात हे 7 बदल नक्की जाणवतील.

शेंगदाणे खाण्याचे फायदे

Everything You Need to Know About Peanuts – Ayoub's Dried Fruits & Nuts

  • बद्धकोष्ठता दूर करते
- Advertisement -

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, आठवडाभर रोज 100 ग्रॅम शेंगदाणे खावे. शेंगदाण्यातील सत्त्व पोटाशी निगडीत समस्यांपासून सुटका करतात. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो.

  • शरीराची ताकद वाढते

ज्याप्रमाणे बदाम आणि अंडी खाल्ल्यानं शरीरातील शक्तीची वाढ होते, त्याप्रमाणेच शेंगदाणे खाल्ल्यानं तुमच्या शरीराला पुरेशी ताकद मिळते. त्याशिवाय पचनक्रियेसाठीदेखील उपयुक्त आहे. थंडीमध्ये शेंगदाणे खाणं चांगलं असतं.

  • गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
- Advertisement -

गर्भात असणाऱ्या बाळाचा विकास शेंगदाणे खाल्ल्याने चांगला होतो. त्याशिवाय गर्भार अवस्थेत ताकद मिळण्यासाठी देखील उपयोग होतो.

Peanuts Slightly Roasted & Salted - Goingnuts

 

 

  • त्वचेसाठी उपयुक्त

शेंगदाण्यात ओमेगा 6 असल्यामुळे त्वचा कोमल आणि नरम राहण्यास मदत होते. शेंगदाण्याचा उपयोग पेस्ट करून फेसपॅक म्हणून करता येतो. थंडीच्या दिवसात शेंगदाण्याच्या पेस्टचा उपयोग कोरड्या त्वचेसाठी होतो.

  • हाडं मजबूत होतात

यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि विटामिन-डी ची योग्य मात्रा असल्यामुळं हाडं मजबूत होतात.

Peanuts: Side effects of eating too many at a time | HealthShots

  • ह्रदयविकारापासून ठेवते दूर

ह्रदयविकाराच्या त्रासापासून शेंगदाणे दूर ठेवतात. शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्यास, ह्रदयाशी निगडीत रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. शिवाय रक्तदेखील योग्य प्रमाणात शरीरामध्ये राहते.

  • सुरकुत्या दिसत नाहीत

वय वाढतं तसं चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. शेंगदाण्यात असलेल्या अॅन्टी – ऑक्सीडंटमुळे या सुरकुत्या न येण्यासाठी मदत होते. शेंगदाणे खाणाऱ्या व्यक्तींची त्वचा असलेल्या वयापेक्षा कमी वयाची दिसते.

 


हेही वाचा :

वेगाने वजन कमी करण्यास मदत करेल काजू

- Advertisment -

Manini