दररोज 30 ग्रॅम ओट्स खाण्याचे आहेत अगणित फायदे

दररोज 30 ग्रॅम ओट्स खाण्याचे आहेत अगणित फायदे

हल्ली अनेकजण वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचे सेवन करतात. ओट्स हा असा पदार्थ आहे, जो खायला स्वादिष्ट असतोच पण त्याचे फायदेही अनेक असतात. दररोज 30 ग्रॅम ओट्स खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. ओट्समध्ये अनेक पौष्टिक घटक आणि फॉस्फोरक असतात.

दररोज ओट्स खाण्याचे फायदे

 

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी ओट्स खाणं गुणकारी असतं. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, लेमन ओट्स खाल्ल्यास, साखरेचं शरीरातील प्रमाण कमी होतं. शिवाय नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ल्यामुळं जास्त भूक न लागता पोट साफ राहतं. पोट साफ राहिल्यामुळे इतर आजार होण्याची संभावना नसते.

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांना रोज ओट्स खाणं अतिशय उपयुक्त आहे. नियमित ओट्स खाण्यामुळे तुम्हाला रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. तर यात असणाऱ्या फायबरमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते.

रोज ओट्स खाल्ल्यामुळे ह्रदयाशी निगडीत आजार होण्याची संभावना कमी होते. बीटा ग्लुकेन फायबरमुळ् कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते. तसेच यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडेंट एवनेथ्रामाइड्स एलडीए कोलेस्ट्रॉलच्या फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळते. तसेच ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

ओट्सचे खाण्यासोबतच चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील उत्तम मानले जाते. त्वचा जास्त कोरडी असल्यास, खाज आणि जळजळ होण्याची समस्या होते. त्यावेळी ओट्स फायदेशीर ठरते. एक चमचा ओट्स कच्च्या दुधात भिजवून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट तोंड आणि हातापायाला लावल्यास, त्वचा मऊ पडते.

रोज ओट्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिजलेले ओट्स शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

ओट्समध्ये असलेल्या फायबर आणि मॅग्नेशियममुळे डोक्यातील सेरोटोनिनची मात्रा वाढते. त्यामुळे डोकं शांत राहून चांगली झोप लागते.


हेही वाचा :

रोज 100 ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्याने होतात ‘हे’ 7 शारीरिक बदल

First Published on: August 31, 2023 4:34 PM
Exit mobile version