पिझ्झा, बर्गर, मॅगी सतत खाणं लहान मुलांसाठी ठरु शकतं घातक

पिझ्झा, बर्गर, मॅगी सतत खाणं लहान मुलांसाठी ठरु शकतं घातक

सध्याच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना नाश्तामध्ये पोहे, शिरा किंवा उपमा खायला आवडत नाही. परंतु मॅगी, पिझ्झा, बर्गर, पास्ता अनेकजण मोठ्या आवडीने खातात. पण हे चमचमीत, लज्जदार पदार्थ कितीही खावेसे वाटले तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. हे पदार्थ शरीरासाठी प्रचंड घातक असतात. कारण हे सर्व पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. मैद्याचे पदार्थ बनवायला सोपे आणि खाण्यासाठी लज्जदार असले तरी देखील ते शरीरासाठी घातक आहेत.

फास्ट फूड खाणं ठरु शकतं घातक

मैदा हा चिकट पदार्थ असतो. त्यामुळे मैद्यापासून बनणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास ते पदार्थ आतड्यांना चिकटतात. तसेच मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाचे आजार सुरु होतात.

लहान मुलं सगळेच पदार्थ पचवू शकत नाहीत. त्यांची वाढ ही त्यांच्या पोषक घटकांवर अवलंबून असते. तसेच मुलांची चरबी ही 5 वर्षानंतर वाढायला लागते. त्यामुळे मुलांनी मैदाचे पदार्थ खाल्ले तर त्याची चरबी बनते. त्यामुळे कमी वयातच जास्त वजन वाढायला लागते. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांचे वजन वाढण्याची भीती 98 टक्के आहे.

 

मैद्याच्या पदार्थांपासून पोषक घटक मिळत नाहीत. तर उलट मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते. यामुळे लहान वयात मधुमेह, थायरॉइड यासारखे आजार होऊ शकतात. तसेच मुलींना पाळी संदर्भात देखील त्रास उद्भवतात.

मुलांची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होणे फार गरजेचे असते. कारण मुलांची उंची काही ठराविक काळापर्यंतच वाढतो. त्यामुळे लहान वयात मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा शरीरावर परिणाम आणि मुलांची उंची खुंटते.

 

मैद्यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतात. त्यामुळे मैद्याचे सेवन केल्याने शुगर लेव्हल वाढते. तसेच मैद्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते. त्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईडची पातळी वाढते.

मैदा बनवताना सोडीअम मेटा बिसल्फेट चा वापर केला जातो. ज्यामुळे गरोदर महिला आणि लहान मुलांना मैदा अपायकारक ठरतो.


हेही वाचा :

रात्री बेरात्री भूक लागते? मग खा ‘हे’ हेल्दी पदार्थ

First Published on: December 4, 2023 7:10 PM
Exit mobile version