हिवाळ्यात अधिक प्रमाणात आवळा खाल्ल्याने उद्भवतात ‘या’ समस्या

हिवाळ्यात अधिक प्रमाणात आवळा खाल्ल्याने उद्भवतात ‘या’ समस्या

आवळ्यामधे अनेक गुणधर्म असतात त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे हे शरीरासाठी उत्तम असते. पण आवळ्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे आणि ते ही हिवाळ्यात, तर त्याने तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो. ऍसिडिटी, ब्लड प्रेशर यासोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रामुख्याने हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करताना सावध राहणे गरजेचे आहे. अधिक प्रमाणात आवळा खाणे शरीरासाठी हानिकारक असते. (Eating too much amla in winter causes ‘these’ problems)

 

१) आवळा शरीरासाठी उत्तम असतो पण हिवाळ्यात आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवतात.

 

२) आवळ्यात अधिक प्रमाणात थंडावा असतो त्यामुळे हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने कफ होण्याचे प्रमाण वाढते.

३) आवळ्यामधे अधिक प्रमाणात सोडियम असते त्यामुळे जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते त्याचा परिणाम ब्लड प्रेशरवर होतो.

४) आवळा आणि आले यांचे एकत्र सेवन केल्याने त्याचा लिव्हरवर परिणाम होतो.

५) आवळ्यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते असते त्यामुळे ऍसिडिटी होते.

 

First Published on: November 5, 2022 3:52 PM
Exit mobile version