उन्हात चालल्याने होणार मधुमेहापासून सुटका

उन्हात चालल्याने होणार मधुमेहापासून सुटका

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये अधिकतर व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचे बघायला मिळते. मुंबई शहरासह देशातील अनेक शहरात मधुमेह या आजारावर केलेल्या अभ्यासानुसार ८४.२ टक्के मधुमेह आणि ८२.६ टक्के मानसिक ताण-तणाव असणाऱ्या रूग्णांमध्ये विटॅमिन डी ची कमतरता असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ९० टक्के जनतेला विटॅमिन डी कमी असण्याच्या समस्येने हैराण आहेत.

देशात आता पर्यंत मधुमेह तसेच व्हिटॅमिन डी ची कमतरता यासमस्येवर कोणताही अभ्यास करण्यात आला नव्हता. मधुमेह तसेच व्हिटॅमिन डी यांमधील नेमका संबंध काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान मधुमेह आणि व्हिटॅमिन डी यांच्यात संबंध आढळला आहे, असे मुंबईच्या डॉ. पी.जी तळवळकर यांनी सांगितले.

दुध आणि हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक

ऑर्थोपेडिक डॉ.बी एस राजपूत यांनी सांगितले की, मधुमेह आणि व्हिटॅमिन डी संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार, व्हिटॅमिन डी च्या कमतरता असल्याने टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मुंबई सारख्या शहरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असणारे अधिक आहे. अधिका-अधिक वेळ ऑफिसमध्ये असल्याने तसेच सकाळच्यावेळी असणारे ऊन न मिळल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. याकरिता लोकांनी जास्त करून दूध आणि हिरव्या पालेभाज्या सेवन करायला पाहिजे. यासोबत सकाळचे कोवळे ऊन घेतल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भासणार नाही.

मधुमेहाच्या रूग्णात होतेय वाढ

शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने हाडांशी संबिधीत गंभीर आजार होऊ शकते. २०११ साली देशातील ३० मिलियन मधुमेह या आजाराचे रूग्ण होते, त्यामध्ये आता वाढ होऊन ७३ मिलियनहून अधिक झाले आहे, असे मुंबईच्या डॉ. पी.जी तळवळकर यांनी सांगितले.

First Published on: August 29, 2019 9:03 AM
Exit mobile version